Santosh Bangar News : व्हिडिओ व्हायरल झालेल्या 'त्या' प्राचार्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Hingoli News : बांगर यांच्यासह 40 जणांविरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसांनी काल (शनिवारी) गुन्हा दाखल केला. यात पाच प्राध्यापकांचाही समावेश आहे.
Santosh Bangar Viral Video
Santosh Bangar Viral Videosarkarnama

Hingoli News : हिंगोली येथील पॉलिटेक्नीक महाविद्यालयातील प्राचार्यास मारहाण केल्याप्रकरणी शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्याविरोधात काल (शनिवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या प्राचार्यांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी काही दिवसापूर्वी हिंगोली येथील पॉलिटेक्नीक महाविद्यालयातील प्राचार्यास मारहाण केली होती, हे प्रकरण बांगर यांना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी बांगर यांच्यासह 40 जणांविरोधात हिंगोली ग्रामीण पोलिसांनी काल (शनिवारी) गुन्हा दाखल केला. यात पाच प्राध्यापकांचाही समावेश आहे.

प्राचार्य डॉ.अशोक उपाध्याय यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेने त्यांच्याविरोधात तक्रार दिली होती. प्राचार्य डॉ.अशोक उपाध्याय एका प्राध्यापिकेला त्रास देत असल्याची तक्रार बांगर यांच्याकडे आली होती.

Santosh Bangar Viral Video
ED News : आयकर विभागाचा 'अधिकारी' ED च्या जाळ्यात ; महागड्या गाड्या, सदनिका जप्त, 263 कोटींची फसवणूक

18 जानेवारी रोजी दुपारी 11.30 ते 12 वाजण्याच्या सुमारास संतोष बांगर यांनी महाविद्यालयात जाऊन प्राचार्यांना मारहाण झाली होती. या घटनेनंतर तब्बल 10 दिवसांनी प्राचार्यांनी तक्रार दिली. त्यामुळे 10 दिवसांनंतर दाखल झालेला गुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Santosh Bangar Viral Video
Sharad Pawar News : 'पहाटेच्या शपथविधी'वर शरद पवारांनी मौन सोडलं ; म्हणाले..

बांगर यांनी प्राचार्यांचे कान पकडून त्यांना मारहाण केली होती, याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हिंगोलीच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात हा प्रकार घडला होता. प्राचार्य डॉ.अशोक उपाध्याय एका प्राध्यापिकेला त्रास देत असल्याची तक्रार बांगर यांच्याकडे आली होती. याचा जाब विचारण्यासाठी बांगर हे डॉ. उपाध्यक्ष यांच्याकडे आले होते. बांगर यांनी केलेल्या या कारनाम्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे.

मारहाणीचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरणाला राजकीय वळण लागले होते. प्राचार्यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी आमदार संतोष बांगर, शंकर बांगर, महाविद्यालयातील अधिव्याख्याता यांच्यासह 40 जणांवर शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Santosh Bangar Viral Video
Tripura Polls 2023 : भाजपचा विरोधकांना झटका ; निवडणुकीपूर्वीच काँग्रेस, माकपा, 'तृणमूल'चे बडे नेते गळाला

या प्रकरणात काल (शनिवारी) पहाटे प्राचार्य डॉ. अशोक उपाध्याय यांनी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. "आमदार संतोष बांगर, शंकर बांगर यांच्यासह प्राध्यापक अशा 40 जणांनी प्राचार्यांच्या कक्षेत येऊन त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. सीसीटीव्हीचे, डीव्हीआरचे वायर तोडून पाच हजार रुपयांचे नुकसान केले, असे डॉ. अशोक उपाध्याय यांनी तक्रारीत म्हटले आहे. आता प्राचार्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याने या प्रकरणाला वेगळ वळण लागलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com