तेव्हा एकनाथ शिंदे ढसाढसा रडत होते...आमदार गायकवाडांनी सांगितली आठवण...

Eknath Shinde|Shivsena|Sanjay Gaikwad : आम्ही कुठे चाललो याबाबतही आम्हाला काहीच माहीत नव्हतं.
Eknath Shinde Latest Marathi News
Eknath Shinde Latest Marathi NewsSarkarnama

Eknath Shinde : गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथ बघायला मिळाल्या. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागला अन् शिवसेनेचे नेते आणि आता मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेविरोधात बंड केले. सुमारे 40 शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांच्या साथीने आणि भाजपच्या (BJP) समर्थनाने नवं सरकार स्थापन केल आहे. आता सत्ता स्थापन झाल्यावर आणि विधिमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकल्यावर शिंदेंसोबत गेलेले आमदार आपल्या मतदारसंघात परतत असून बंड का केले याबात मतदारसंघातील शिवसैनिकांना स्पष्टीकरण देत आहेत.

दरम्यान, विदर्भातील बुलडाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) हेही आपल्या मतदारसंघात परतले असून त्यांनी माध्यमांशी बोलताना मुंबई ते गुजरात, गुवाहटी, गोवा आणि मुंबई असा केलेला प्रवास उलगडला आणि या प्रवासादरम्यान घडलेले काही प्रसंग त्यांनी सांगितले. ते म्हणाले, जेव्हा शिंदे यांनी बंड केला (त्यांच्या भाषेत उठाव) त्यावेळी गुजरातला जाताना त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. गुजरातला गेल्यावरही त्यांना रडू कोसळल होतं, अशी आठवण आमदार गायकवाडांनी सांगितली.

Eknath Shinde Latest Marathi News
शिवसेना बांगरांची उचलबांगडी करणार; हिंगोलीचा जिल्हा प्रमुख बदलणार...

गायकवाड आठवण सांगतांना म्हणाले, तब्बल 40 वर्षे पक्षासाठी काम करणारी व्यक्ती जेव्हा ढसाढसा रडत असेल तर सर्वसामान्य आमदारांचं काय?, असा प्रश्न आम्हाला सतावत होता. कारण शिंदे हे प्रवासादरम्यान गाडीत सुमारे 1 तासभर रडत होते, तिथे गेल्यावरही त्यांच्या डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं, हा घेतलेला कठोर निर्णय त्यांना खूप वेदना देत होता. मात्र आता माघार नाही, असं त्यांनी ठरवल्याने पुढील सर्व गोष्टी घडल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Eknath Shinde Latest Marathi News
शिवसेना नेते संजय राऊत यांना सोमय्यांचा मोठा दणका; अटक वॉरंट जारी

आमचा मुंबई ते सुरत हा प्रवास आश्चर्यकारक तर होताच मात्र आम्ही कुठे चाललो याबाबतही आम्हाला काहीच माहित नव्हतं. शिंदे आम्हाला बाहेर भेटतील एव्हढाचं निरोप होता. पण, ते थेट सूरतलाच आम्हाला भेटले. सुरतमध्ये पोहोचल्यावर अचानकपणे तिथे 30 ते 35 आमदार तिथे होते. अंगावरच्या कपड्यांमध्येच आम्ही तिथे गेलो होतो. त्यानंतर सूरतहून आम्ही गुवाहाटीला गेलो. नंतर तिथे राज्यातील इतर आमदार आले. बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला आणि शिवसेना वाचवायची, शिवसेना पुढे न्यायची आहे, अशी चर्चा आमच्यामध्ये होती. तिथे असतांना आपण काहीही करा पण महाविकास आघाडीमधून बाहेर पडा आम्ही परत येण्यास तयार आहोत, असे आम्ही पक्षश्रेष्ठींना सांगत होतो. तसेच सुरतला मिलिंद नार्वेकर आले तेव्हाही आम्ही त्यांना हेच सांगितले होते, असे गायकवाडांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com