Corona News Update आमदार संग्राम थोपटे, आणि डॉ.रत्नाकर गुट्टे   यांना कोरोनाचा संसर्ग
Sangram thopte- Dr. ratnakar Gutte Sarkarnama

Corona News Update आमदार संग्राम थोपटे, आणि डॉ.रत्नाकर गुट्टे यांना कोरोनाचा संसर्ग

राज्यात कोरोनाच्या (Corona virus) तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असून आतापर्यंत एक डझनहून अधिक आमदार (MLA) आणि नेतेमंडळींना कोरोनाचा संसर्ग झाला आहे

पुणे : भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopte) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना कोरोना विषाणूची (Corona virus) कोणतीही लक्षणे नव्हती. परंतु दोन दिवसांपासून काहीसा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करून घेतली. सोमवारी (ता.10) रात्री त्यांच्या रिपोर्ट पॉझिटिव्ह (Positive) आला. (Corona News Update_)

त्यानंतर संग्राम थोपटे यांनी सोशल मिडीयावर आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे त्यांंनी सांगितले आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्व नागरिकांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन संग्राम थोपटे यांनी केले. डॉक्टरांच्या सल्यानुसार मी पुढील उपचार घेत आहे. भोर विधानसभा मतदारसंघातील भोर, वेल्हे व मुळशी तालुक्यातील नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा आणि सोशल डिस्टंसींगचे पालन करावे. असे सांगत मी पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होणार असल्याचे भावनिक आवाहन आमदार संग्राम थोपटे यांनी केले.

Sangram thopte- Dr. ratnakar Gutte
महाविकास आघाडीला दणक्याची तयारी : सेनेच्या तीन आमदारांवर भाजपचा डोळा

तर दूसरीकडे काल सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्यासोबत कार्यक्रमात असलेले गंगाखेडचे आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे (Ashok Gutte) यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांना लक्षणे जाणवू लागल्याने त्यांनी स्वतःची कोरोना चाचणी केली असता त्यांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे .

गंगाखेड येथे काल रेल्वे उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी मंत्री अशोक चव्हाण, खासदार संजय जाधवांसाहित पाचपेक्षा अधिक आमदार गुट्टे यांच्या संपर्कात आले होते. कार्यक्रमानंतर या सर्वच मंडळींनी अशोक चव्हाण यांच्यासह गुट्टेंच्या घरी जेवणही केले. त्यामुळे आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन आमदार गुट्टे यांनी केले आहे.

Sangram thopte- Dr. ratnakar Gutte
अपक्ष आमदाराने भाजपला ऐनवेळी दाखवला ठेंगा!

दरम्यान गेल्या महिनाभरात राज्यातील अनेक आमदार, खासदार आणि नेते मंडळींना कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. राज्यातील डझनभरापेक्षा जास्त आमदारांना आणि नेत्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असून त्यातील काहीजण बरे झाले आहेत, तर काहींवर अद्यापही उपचार सुरु आहेत.

आतापर्यत राज्यात मंत्री जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार संजय राऊत,माजी खासदार प्रफुल्ल पटेल, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार शिवाजीराव कर्डिले, उदयसिंह रजपूत, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह महिला आणि बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी, भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासह १० मंत्री आणि २० कोरोना पाॅझिटिव्ह आमदारांर उपचार सुरु आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in