चंद्रकांतदादा... दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्तेचे स्वप्नं किती वेळा बघणार?

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Chandrakant Patil-Rohit Pawar
Chandrakant Patil-Rohit PawarSarkarnama

मुंबई : 'मातोश्री'विरोधात पंगा घेणाऱ्या राणा दाम्पत्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या आरोपाखाली १५३ अ अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर खार पोलिसांनी त्यांना शनिवारी अटक केली होती. त्यानंतर त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावरुन आता आरोप-प्रत्योरापाचे राजकारण रंगले आहे.

भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करत ''उत्तम ! हिंदू धर्मियांचा पवित्र "हनुमान चालिसा" म्हणणे हा शिवसेनेच्या राज्यात राजद्रोहाचा गुन्हा ठरला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांनी साहेबांचे हिंदुत्व मिठी नदीत "बुडवून दाखवले!'' असा टोला त्यांनी लगावला होता.

Chandrakant Patil-Rohit Pawar
भ्रष्टाचार करुन मान शरमेने खाली जाईल असे वागू नका!

त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी पाटील यांना जोरदार प्रत्यूत्तर दिले आहे. या संदर्भात रोहित पवार यांनी ट्वीट केले आहे. त्यामध्ये ते म्हणाले, ''दादा…राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत जाणीवपूर्वक असंवैधानिक भाषा वापरून तणाव निर्माण करणे आणि कायदा व सुव्यवस्था बिघडवून सामान्य लोकांना त्रास देणे हा राजद्रोह नाही का? प्रत्येक वेळी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून सत्तेचे टार्गेट गाठण्याचे स्वप्नं किती वेळा बघणार?'' असा सवाल त्यांनी केला आहे.

दरम्यान, दरम्यान, सरकारी वकील प्रदीप घरत म्हणाले, ''मुख्यमंत्र्यांच्या घरी कुणाला जायचे असेल तर परवानगीची गरज असते. तशी नोटीस खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना दिली होती. मुख्यमंत्र्यांना अपशब्द वापरुन त्यांनी चॅलेंज केले. त्यांनी नोटिशीला न जुमानता सरकारला आव्हान दिले. त्यामुळे त्यांचा अप्रामाणिक हेतू दिसून आला, त्यामुळे त्यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,''

Chandrakant Patil-Rohit Pawar
देशद्रोही, गुन्हेगारांविषयी भाजपला एवढी मळमळ का? संजय राऊतांचा सवाल

राणांचे वकीस रिझवान मर्चंट यांनी आंदोलकांवर कारवाई करण्याऐवजी आंदोलन दुपारी मागे घेणाऱ्या राणा दाम्पत्यावर कारवाई केली. राणा दाम्पत्याविरोधात लावलेल्या कलमांवर देखील मर्चंट यांनी आक्षेप घेतला आणि अटकेचा विरोध केला. पोलिस कोठडी देण्यासही त्यांनी विरोध केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com