होय,पवारसाहेब खोटं बोलले त्यांचा आम्हाला अभिमान आहे..

''प्रणव मुखर्जी साहेबांनीही पवार साहेबांना आणि मुंबईला सलाम केला होता,''

Rohit Pawar, Sharad Pawar
Rohit Pawar, Sharad Pawarsarkarnama

मुंबई :राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (ncp)अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून विरोधक टीका करीत आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी टि्वट करीत विरोधकांवर निशाणा साधला आहे. देशात नुकत्याच काही ठिकाणी दंगली झाल्या.या पार्श्वभूमीवर रोहित पवारांनी (Rohit Pawar)भाजप (bjp) नेत्यांवर सडकून टीका केली आहे.

''१९९३ सालच्या मुंबई दंगलीची चौकशी करणाऱ्या न्या.श्रीकृष्ण आयोगानेही आदरणीय पवार साहेबांच्या खोटं बोलण्याची विशेष दखल घेत 'This is the example of statesmanship' अशा शब्दांत वाखाणणी केली. होय! म्हणूनच साहेबांच्या खोटं बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे,असे टि्वट रोहित पवारांनी केलं आहे.

''राज्यात दंगल भडकवण्याच्या ISIच्या प्रयत्नांना उधळून लावत आदरणीय पवार साहेबांनी तेव्हा राज्यात शांतता प्रस्थापित केली होती.पण आज दंगल भडकवून त्या आगीत राजकीय पोळी भाजण्याचा तर कुणाचा प्रयत्न नाही ना?'' असा सवाल रोहित पवारांनी भाजप नेत्यांना केला आहे.


Rohit Pawar, Sharad Pawar
बाळासाहेबांच्या खाल्ल्या मिठाला तरी जागा, महाराष्ट्राची बदनामी करु नका ; सुळेंनी सुनावलं

दुसऱ्या टि्वटमध्ये रोहित पवार म्हणतात, ''होय!आदरणीय शरद पवार साहेब खोटं बोलले आणि त्यांच्या या बोलण्याचा आम्हाला अभिमान आहे! साहेबांच्या त्या बोलण्यामुळं मुंबईत जातीय दंगल घडवण्याचे ISI चे मनसुबे उधळले गेले आणि म्हणूनच राष्ट्रपती असताना खुद्द स्व. प्रणव मुखर्जी साहेबांनीही पवार साहेबांना आणि मुंबईला सलाम केला होता,''

''शरद पवार आणि अजित पवार यांना टार्गेट करणे म्हणजे राज्याच्या संस्कृतीला टार्गेट करणे आहे. लोकशाही मार्गाने भाजपला विजय मिळवता येत नाही, त्यामुळे सोशल मीडिया, केंद्रीय यंत्रणा हाताशी धरून, मुंबई महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीच्या नेत्यांना टार्गेट केले जात आहे,''असे रोहित पवार यांनी रविवारी म्हटले होते.


Rohit Pawar, Sharad Pawar
मोदींना सुळे म्हणाल्या, 'इंदापूरला या, आम्ही तुम्हाला चार गोष्टी सुचवतो,'

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेवर सडकून टीका केली आहे.''महाराष्ट्र दिल्ली समोर झुकणार नाही, आणि जर कुणी गडबड केली तर ऐकून घेणार नाही,'' असे म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे नाव न घेता सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला. त्या इंदापूर येथे बोलत होत्या.

''नवीन उद्योगांची उभारणी करण्यासाठी महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिलेला आहे. हे मी सांगत नाही तर केंद्र सरकारचा डेटा सांगतो आहे. त्यामुळे या महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्यांनी कृपया दूर राहावं,'' असा सल्ला सुप्रिया सुळे यांनी राज ठाकरेंचे नाव न घेता दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com