'राज्यसभा निवडणुकीत अपक्ष आमदार मोठा भूकंप करणार!'

आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली
Devendra Fadnavis, Ravi Rana
Devendra Fadnavis, Ravi Ranasarkarnama

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (RajyaSabha Election) तोंडावर अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतली. राज्यसभेच्या निवडणुकीबद्दल फडणवीस यांच्याशी दीड तास चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

राज्यसभा निवडणुकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना जोरदार धक्का बसणार असल्याचे राणा यांनी म्हटले आहे. या निवडणुकीत अपक्ष आमदार मोठा भूकंप करणार असल्याचा दावा राणा यांनी केला आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेवरुन मोठ्या प्रमाणात राजकारण रंगले आहे.

Devendra Fadnavis, Ravi Rana
पंकजा मुंडेंची नाराजी लगेच दूर होणार नाही; पण भविष्यात विचार करु!

भाजपने सहाव्या जागेसाठी धनंजय महाडीक यांनी उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेने संजय पवार यांना मैदानात उतरवले आहे. त्यामुळे भाजप व शिवसेनेकडून सध्या अपक्ष आमदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्याच रवी राणा यांनी अपक्ष आमदारांबद्दल मोठे विधान केले आहे.

दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत तिसरा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी भाजपने तिघांवर सोपविली आहे. यात माजी मंत्री गिरीश महाजन यांचा समावेश आहे. यासाठी महाजन यांनी भेटीगाठी सुरू केल्या आहेत. या बाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, लहान पक्ष व काही अपक्ष आमदार आमच्यासोबत आहेत, आमच्याकडे तिसरा उमेदवार जिंकण्याइतके पुरेसे संख्याबळ आहे.

Devendra Fadnavis, Ravi Rana
महाविकास आघाडी मोठा धक्का ; देशमुख, मलिकांना मतदानासाठी परवानगी नाकारली

आपण छातीठोकपणे सांगू शकतो की आमचा तिसरा उमेदवार विजयी होणारच. शिवसेनेचे आमदारच त्यांच्यावर नाराज आहेत. ते आता जाहीरपणे मंत्री टक्केवारी घेत असल्याची टीका करीत आहेत, घटक पक्षातील बच्चू कडू, अबू आझमी नाराज आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीला त्यांचा पराभव दिसत आहे. त्यासाठी आता हॉटेल टू हॉटेल धावपळ सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com