अपक्ष आमदार माझ्या संपर्कात, शिवसेनेला मतदान करण्यासाठी दबाव! राणांचा मुख्यमंत्र्यांवर आरोप

राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
CM Uddhav Thackeray Latest Marathi News, Ravi Rana Latest News, Navneet Rana Latest News, Maharashtra Political News Updates
CM Uddhav Thackeray Latest Marathi News, Ravi Rana Latest News, Navneet Rana Latest News, Maharashtra Political News UpdatesSarkarnama

मुंबई : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडीला मतदान करण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यासाठी ही नोटीस बजावल्याचा दावा राणांनी केला आहे. (Ravi Rana Latest Marathi News)

राणा दाम्पत्यावर खार पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात येत्या आठ तारखेला न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. त्यासाठी या दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.

CM Uddhav Thackeray Latest Marathi News, Ravi Rana Latest News, Navneet Rana Latest News, Maharashtra Political News Updates
अखिलेश यांनी पत्नीलाच घरी बसवलं; लोकसभेच्या निवडणुकीत चुलत भावाला झुकतं माप

राज्यसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही नोटीस आल्याने राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. ते म्हणाले, राज्यसभेची निवडणूक दहा तारखेला आहे. मला आठ तारखेला हजर राहण्यासाठी मुंबई पोलिसांनी पत्र पाठवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा वापर करून घेत आहेत.

कुठल्या ना कुठल्या पद्धतीने माझ्यावर दबाव आणून महाविकास आघाडीला मी मतदान करावे, भाजपच्याविरोधात जावं, असा दबाव नोटीसच्या माध्यमातून टाकला जात आहे. अपक्ष आमदार माझ्या संपर्कात आहेत. तीन दिवसांत अनेक आमदारांच्या माझ्याशी भेट झाली असल्याचा दावा राणा यांनी केला आहे.

CM Uddhav Thackeray Latest Marathi News, Ravi Rana Latest News, Navneet Rana Latest News, Maharashtra Political News Updates
...तर शेवटच्या पाच मिनिटांत मतदान मारणार! बच्चू कडूंनी वाढवलं शिवसेनेचं टेन्शन

या माझ्या भेटी थांबल्या पाहिजेत, ते आमदार महाविकास आघाडीविरोधात जाऊ नयेत, म्हणून नोटीस पाठवून माझ्याविरोधात दबावतंत्र सुरू केले आहे. पण मी कुठल्याही दबावाला बळी पडणार नाही. महाविकास आघाडीचा म्हणजे शिवसेनेचा उमेदवार पराभूत होईल आणि भाजपचा उमेदवार निवडून येईल ही काळ्या दगडावरची रेघ आहे, असंही राणा यांनी सांगितलं.

पोलिसांनी का पाठवली नोटीस?

हनुमान चालीस प्रकरणी रामा दाम्पत्यावर खार पोलीस ठाण्यात सरकारी कामा अडथळा आणल्याचा एक गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून वांद्रे येथील मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. त्यासाठी येत्या आठ तारखेला सकाळी 11 वाजता न्यायालयात हजर राहावे, अशी नोटीस पोलिसांनी बजावली आहे. (Mumbai Police issued notice to Ravi Rana and Navneet Rana)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com