मोठी बातमी : राणा दाम्पत्य बारा दिवसांनंतर येणार तुरूंगातून बाहेर

नवनीत राणा व रवी राणा हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
Navneet Rana | Ravi Rana |
Navneet Rana | Ravi Rana |Sarkarnama

मुंबई : न्यायालयीन कोठडीत असलेल्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. दोघांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. मागील बारा दिवसांपासून दोघेही तुरुंगात आहेत. दोघांवर राजद्रोहाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. रवी राणा सध्या तळोजा कारागृहात तर नवनीत राणा भायखळा कारागृहात आहेत.

न्यायालयानो दोघांनाही पन्नास हजार रुपयांच्या जातमुचल्यावर जामीन देण्यात आला आहे. त्यांना 23 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी जामीनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयात त्यावर अखेरचा युक्तीवाद 30 एप्रिल रोजी झाला होता. त्यानंतर तीन दिवस त्यावरील निकाल लांबला. अखेर बुधवारी सकाळी न्यायालयाने निकालाचे वाचन केले. दोघांनाही जामीन देण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला.

Navneet Rana | Ravi Rana |
नवनीत राणांना जे. जे. रुग्णालयात हलवलं! आजच जामिनाचा निकाल लागणार

सरकारच्यावतीने अॅड. प्रदीप घरत (Pradeep Gharat) यांनी न्यायालयात दोघांना जामीन न देण्याची जोरदार मागणी केली होती. राणांच्या वतीने त्यांच्या वकीलांनीही जामीनाची मागणी करत बेकायदेशीरपणे त्यांना अटक केल्याचे सांगितले. घरत यांनी सांगितले होते की, राणांविरोधात कलम गंभीर आहे. राजद्रोहाच्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा आहे. त्यांना जामीन झाला तर दबाव येऊ शकतो. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.

रवी राणा यांच्याविरोधात 17 आणि नवनीत राणा यांच्याविरोधा सहा गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. नवनीत राणा यांच्याविरोधात मुलुंड पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रांचा गुन्हा आहे. बोरीवली येथून त्यांनी खोटा शाळेचा दाखला मिळवला होता. हे मुद्दे न्यायालयासमोर मांडून जामीनाला विरोध केला होता. पण न्यायालयाने राणा दाम्पत्याच्या वकिलांनी मांडलेली बाजू ग्राह्य धरून दोघांना जामीन मंजूर केला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. त्यासाठी आदल्यादिवशी ते दोघेही त्यांच्या खार येथील निवासस्थानी आले होते. पण पोलिसांनी त्यांना मातोश्रीसमोर न जाण्याची नोटीस बजावली होती. पण यादरम्यान शिवसैनिकांच्या राणांच्या घरासमोर जोरदार आंदोलन केले. दिवसभर मोठा राडा झाला होता. यादरम्यान पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com