आबिटकर घाबरु नका, पुढे या ; बंडखोर आमदारांचा हॉटेलमध्ये संवाद

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे.
Prakash Abitkar, eknath shinde
Prakash Abitkar, eknath shindesarkarnama

मुंबई : शिवसेनेचे भुदरगड- राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar)‘नॉटरिचेबल’ झाले असल्याच्या चर्चा दोन दिवसापासून सुरु होत्या. आमदार प्रकाश आबिटकर सोमवारपासून नॉटरिचेबल होते. ते एकनाथ शिंदे (eknath shinde)यांच्यासोबत असल्याची चर्चा होती. (eknath shinde latest news)

आबिटकर हे अचानकपणे एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरतच्या हॉटेलमध्ये दिसले. या ठिकाणी असलेल्या अन्य शिवसेनेच्या बंडखोर आमदारासोबत ते असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एकनाथ शिंदे आपल्या ४० बंडखोर आमदारांसोबत ते दिसत आहेत.

"एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ है," अशा घोषणा यावेळी आमदारांनी दिल्या. "आबिटकर घाबरु नका..पुढे या.." असे आबिटकर यांना अन्य आमदार सांगत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते.

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आता स्वतंत्र गट स्थापन करण्याची आता दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे.

शिंदे हे 40 बंडखोर आमदारांसह सूरत विमानतळावरून एका चार्टर विमानानं गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. "सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड आम्ही करणार नाहीत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत त्यामुळे त्यांच्या विचारांवर आम्ही काम करणार आहोत. म्हणून, बाळासाहेबांच्या विचाराचे सर्व आमदार एकत्र आले आहेत," असे शिंदे म्हणाले.

Prakash Abitkar, eknath shinde
शिंदे हे दिघे यांचे शिष्य, गद्दारी त्यांच्या रक्तात नाही ; ठाकरे सरकारला धोका नाही!

"आम्ही गुवाहाटीत 40 पेक्षा जास्त आमदार आहोत. आम्ही शिवसेना सोडण्याचा तसेच इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला नाही, फक्त आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांची भूमिका पुढे घेऊ जात आहोत. अद्याप राज्यपालांना भेटण्याचा तसेच भाजपला पाठिंबा देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही," असे शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.

"मी कालही कट्टर शिवसैनिक होतो आणि आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आमची भूमिका सुरुवातीपासून हिंदुत्वाची होती त्यामुळे मी बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार आहे. माझ्यासोबत कुठल्याही जोर जबरदस्तीने आमदार आलेले नाहीत. स्वत:च्या मर्जेने ते माझ्यासोबत आले आहेत. 40 पेक्षा जास्त आमदार माझ्यासोबत आहेत," असे शिंदे यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले, "सध्या आम्ही कोणावर टीका टिप्पणी केलेली नाही. त्यामुळे विकासाचे राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.मी कालही कट्टर शिवसैनिक होतो आणि आजही आहे आणि उद्याही राहणार आहे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com