त्यांना संपवण्याची हीच वेळ, खरी समस्या भोंगे नाही; नितेश राणे आक्रमक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण आहे.
Nitesh Rane latest News in Marathi, Loudspeaker controversy news
Nitesh Rane latest News in Marathi, Loudspeaker controversy newsSarkarnama

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेनंतर राज्यात अनेक ठिकाणी तणावाचे वातावरण आहे. बुधवारी भोंगे न लावता अनेक मशिदींमध्ये नमाज पठण करण्यात आले. तर काही मशिदींमध्ये भोंग्यांचा आवाज आल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्यावर हनुमान चालिसा लावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यातच आता भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भोंगे ही खरी समस्या नसल्याचे म्हटले आहे. रझा अकादमी आणि पीएफआय या संघटनांवर बंदी घातली तरच शांतता निर्माण होतील, असं त्यांनी सांगितले. (Nitesh Rane latest News in Marathi)

राणे यांनी याबाबत ट्विट करून दोन्ही संघटनांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. त्यांना संपवण्याची हीच वेळ असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 'भोंगे ही खरी समस्या नाही. रझा अकादमी आणि पीएफआय या विष पसरवणाऱ्या दहशतवादी संघटना खरी समस्या आहे. त्यांच्याविरोधात एकत्रितपणे लढा उभारण्याची ही वेळ आहे. प्रत्येकाने एकत्र येऊन त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी दबाव टाकायला हवा. त्यानंतरच शांतता नांदेल,' असं राणे यांनी म्हटलं आहे.

Nitesh Rane latest News in Marathi, Loudspeaker controversy news
नवनीत राणांना जे. जे. रुग्णालयात हलवलं! आजच जामिनाचा निकाल लागणार

रझा अकादमी ही दहशतवादी संघटना आहे. धर्मादाय आयुक्तालयाकडे या संघटनेची नोंद नाही. म्हणजे नोंदणी क्रमांक नाही. तरी राज्य सरकार या संघटनेला आंदोलन करण्यास आणि सुरू ठेवण्यासाठी परवानगी देत आहे. त्यांना कोण निधी देतं हे कसं कळणार? या संघटनांची सर्व कामे थांबवायला हवीत, अशी मागणीही राणे यांनी केली आहे.

खरे मुस्लिम हे कधीच राज्य किंवा देशाच्या विरोधात नसतील. हिंदू आणि इतर धर्मियांप्रमाणेच तेही आपल्या भूमीवर प्रेम करतात. रझा अकादमी आणि पीएफआयसारख्या संघटना समाजामध्ये द्वेष निर्माण करतात. अमरावती आणि नांदेडमधील दंगली हे त्याचं उदाहरण आहे. त्यामुळे आता त्यांना संपवण्याची हीच वेळ आहे, असं राणे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com