वाई मतदारसंघातील रस्त्यांसाठी मकरंद पाटलांनी आणले 133.90 कोटी

राज्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असतानाही प्रत्येक गावच्या मुलभूत सुविधांकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या मागणीनुसार विविध रस्ते, गटर्स बांधणे व पूल बांधणी तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत मांढरदेवी देवस्थानच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वर्षभर लाखो भाविक येत असतात.
MLA Makrand Patil brought Rs 133.90 crore for roads in Wai constituency
MLA Makrand Patil brought Rs 133.90 crore for roads in Wai constituency

वाई : वाई विधानसभा मतदारसंघातील वाई, खंडाळा, महाबळेश्वर या तालुक्यातील वाहतूकीची सुविधा अधिक चांगली होण्यासह ग्रामीण भागातील लोकांच्या दळणवळणाचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून विविध रस्त्यांच्या कामांसाठी 133 कोटी 90 लाख रुपये निधी मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार मकरंद पाटील यांनी दिली. त्यामुळे धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळे आणि ग्रामीण भागातील दळणवळण अधिक गतिमान होणार आहे. 

वाई, खंडाळा, महाबळेश्वर तालुक्यातील गावांना रस्त्यांच्या सुविधा चांगल्या असाव्यात यासाठी आमदार पाटील यांनी कटाक्षाने लक्ष घातले आहे. राज्यातील सर्वात मोठा मतदारसंघ असतानाही प्रत्येक गावच्या मुलभूत सुविधांकडे त्यांनी विशेष लक्ष पुरविले आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या मागणीनुसार विविध रस्ते, गटर्स बांधणे व पूल बांधणी तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत मांढरदेवी देवस्थानच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून वर्षभर लाखो भाविक येत असतात.

यासाठी वाई ते मांढरदेव रस्त्यासाठी 65 कोटींचा निधी उपलब्ध् करुन घेतला आहे. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा खोऱ्यातील पर्यटनाला चालना मिळावी. पर्यटकांचा व स्थानिक ग्रामस्थांचा प्रवास सुखकर व्हावा. यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातून विशेष 15 कोटींचा निधी मिळवला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे. 

या मंजुर कामांमध्ये वाई तालुक्यातील मांढरदेवी ते वाई रस्ता (65 कोटी), बोपेगांव ते खानापूर रस्त्यावर पुल बांधकाम (2 कोटी 16 लाख) , मेणवली ते वरखडवाडी फाटा रस्ता ( 1 कोटी ), भिवडी ते बलकवडी रस्ता ( 2 कोटी 50 लाख), बालेघर ते मांढरदेव रस्ता ( 1 कोटी ), डुईचीवाडी ते बारसेवाडी रस्ता (2 कोटी 25 लाख), शिरगांव ते किकली रस्ता ( 2 कोटी ), बोपेगांव जाधववस्ती ते खानापुर फाटा रस्ता ( 4 कोटी), वाई मुस्लीम कब्रस्तान जवळ संरक्षक भिंत बांधकाम ( 2 कोटी ).

 वाई बावधन नाका ते बावधन रस्ता दोन्ही बाजुस आर.सी.गटर्स ( 2 कोटी ), देगांव गावठाण मध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजुस आर.सी.सी.गटरचे बांधकाम ( 1 कोटी), वाई - पाचवड रस्त्यावर पुलाचे बांधकाम ( 2 कोटी), चांदक येथील पोहोच रस्त्यासह पुलाचे बांधकाम ( 1 कोटी 80 लाख), सटालेवाडी घाट येथील घाट लांबीची सुधारणा व रस्ते सुरक्षा उपाययोजना ( 1 कोटी 30 लाख).

 राष्ट्रीय महामार्ग भुईज ते कारखाना रस्ता ( 3 कोटी), कुसगांव येथील पुलाचे बांधकाम (70 लाख). खंडाळा तालुक्यातील - खंडाळा येथील शिवाजी चौक ते शिवाजीनगर रस्ता ( 1 कोटी 50 लाख), लोणी भादवडे ते शिवाजीनगर रस्ता ( 1 कोटी 50 लाख), लोहोम ते असवली रस्ता ( 2 कोटी ), बावडा ते खंडाळा रस्ता ( 1 कोटी ), धावडवाडी ते अहिरे रस्ता ( 1 कोटी 10 लाख), वाघोशी ते प्र.रा.मा. 15 (वाघोशी खिंड) रस्ता ( 1 कोटी ), पाडळी येथील निकमवस्ती ते पाडळी रस्ता ( 1 कोटी 25 लाख), कण्हेरी येथे पुल बांधणे ( 1 कोटी 25 लाख). 

महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा ते महाबळेश्वर रस्ता ( 15 कोटी), चतुरबेट येथील पुल बांधणे ( 5 कोटी 50 लाख), शिरवली ते कळमगांव रस्ता ( 3 कोटी ), चतुरबेट ते दाभेमोहन रस्ता ( 2 कोटी 40 लाख), उचाट येथील पुलाचे बांधकाम ( 2 कोटी 50 लाख), कळमगांव येथील पुल बांधणे. ( 68 लाख), वेण्णादर्शन शासकीय विश्रामगृह सुधारणा (90 लाख) करणे आदी विकास कामांचा समावेश आहे. 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com