शिंदेच्या तावडीतून सुटलेले आमदार कैलास पाटील ठाकरेंसमोर धाय मोकलून रडले...

कैलास पाटल यांची कथा मुख्यमंत्री ठाकरेंनी ऐकली अन् शिवसैनिकांसह अख्खी ‘मातोश्री’ गहिवरली
Kailas Patil Latest News
Kailas Patil Latest NewsSarkarnama

मुंबई : शिवसेनेच्या (Shivsena) आमदारांसोबत बंडाचा झेंडा फडकवणाऱ्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या तावडीतून रहस्यमयरित्या सुटलेल्या आमदार कैलास पाटील (Kailas Patil) यांची कथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी ऐकली अन शिवसैनिकांसह अख्खी ‘मातोश्री’ गहिवरली.

Kailas Patil Latest News
शिंदेंच्या बंडामागे ना फडणवीसांची फूस, ना ठाकरेंवर नाराजी; खरा रोष अजित पवारांवर

उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांना ठाण्यात स्नेहभोजनासाठी बोलविण्यात आले. सहकारी आमदारांसह ते पोहोचले. रात्री उशिरा सर्व आमदारांसह त्यांनाही गाडीत बसवून थेट मुंबई बाहेर घेऊन जात असताना पाटील यांच्या मनात पाल चुकचुकली. गाडीत बसतानाच त्यांचा फोन काढून घेण्यात आला. रात्रीच्या अंधारात गाडी गुजरातच्या दिशेने जात होती. ‘ना बोलता येईना ना कुणाला मदत मागता येईना,’अशा अवघडलेल्या अवस्थेत ते गप्प बसून राहिले.

Kailas Patil Latest News
एकनाथ शिंदेंच्या बंडाची प्राथमिक तयारी फडणवीस-पाटलांकडूनच

गुजरात सीमेवर पोलिसांचा ताफा होता. त्या दरम्यान गाडी चहापानासाठी थांबली असता कैलास पाटील यांनी लघुशंकेच्या निमित्ताने अंधारात धूम ठोकली. पावसात ते रस्त्यावरून धावत होते. एका ट्रकमध्ये बसून ते मुंबईच्या दिशेने सुमारे चाळीस किलोमीटरपर्यंत आले. ट्रक दुसऱ्या बाजूने जाणार असल्याने ते उतरले. वाहनचालकांकडे लिफ्ट मागत पाटील यांनी मुंबई गाठली. आज सकाळी ते थेट ‘मातोश्री’वर दाखल झाले अन धाय मोकलून रडू लागले. हा सगळा प्रसंग त्यांनी ठाकरे यांना सांगितला.

दरम्यान, शिंदे यांच्याशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोनवरून संपर्क केला असून त्यांनी सुमारे 20 मिनिटे चर्चा केली. या चर्चेमध्ये शिंदे यांनी शिवसेेनेने भाजप सोबत सरकार स्थापन करण्याची मागणी केली असून अन्य काही अटी ठेवल्या आहेत. यावर ठाकरे यांनी मुंबईत या चर्चा करू, असे सांगितले. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिंदे परत येतील,असा विश्वास व्यक्त केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com