संजय राऊतांकडून दगाबाजीचे आरोप; आमदार देवेंद्र भुयार शरद पवारांना भेटणार

Devendra Bhuyar| Sanjay Raut| संजय राऊत चुकतायेत. ते खूप मोठे नेते आहे मात्र असा आरोप करणे योग्य नाही.
Devendra Bhuyar|
Devendra Bhuyar|

मुंबई : राज्यसभेतील शिवसेनेच्या पराभवानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांंवर आरोप केला होता. संजय राऊत यांनी निवडणूकीत दगाबाजी करणाऱ्या अपक्ष आमदारांची नावेही जाहीर केली. बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, क्षितीज ठाकूर, राजेश पाटील, देवेंद्र भुयार (अपक्ष), संजय मामा शिंदे (अपक्ष), श्यामसुंदर शिंदे (अपक्ष) यांची मत आम्हाला मिळाली नसल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत यांच्या आरोपानंतर आज देवेंद्र भुयार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत. देवेंद्र भुयार आज अपक्षांच्या भावना व्यक्त करण्यासाठी, संजय राऊत यांच्या बद्दल शरद पवार यांच्याकडे नाराजी व्यक्त करण्यासाठी जाणार आहे. ''मी संजय राऊत यांच्या पक्षातून निवडून आलेलो नाही. मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सोबत राहून निवडून आलो आहे, मग मी गद्दारी कशी केली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे

Devendra Bhuyar|
छत्रपतींच्या अपमानाचा बदला...; संभाजीराजे समर्थकांकडून शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी

मी संजय राऊत यांच्या पूर्वीपासून आघाडीपासून जोडलेला आहे, मी लोकसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेस सोबत काम करत आहे. संजय राऊत आणि त्यांचा पक्ष तर विधानसभा निवडणुकीनंतर आघाडीसोबत आला. मी विश्वास मताच्या वेळेलाही महाविकास आघाडी सरकारला मतदान केलं होतं. गद्दारी करायची असती तर तेव्हाच केली असती, असंही देवेंद्र भुयार यांनी म्हटंल आहे.

संजय राऊत चुकतायेत. ते खूप मोठे नेते आहे मात्र असा आरोप करणे योग्य नाही. मी पहिल्या पसंतीचे मत संजय पवार व दुसऱ्या पसंतीचा मत संजय राऊत यांना दिल्याचा खुलासाही देवेंद्र भुयार यांनी केला आहे. तसेच शिवसेनेचे नियोजन चुकलं. शिवसेनेचे उमेदवार मला फक्त हॉटेलमध्ये भेटले. एक फोन सुद्धा केला नाही. मला अजित पवार तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांनी ज्या सूचना केल्या त्या त्याप्रमाणे मी मतदान केलं. असंही देवेंद्र भुयार यांनी स्पष्ट केलं.

पण या सर्व गोष्टी मी शरद पवारांना भेटून सांगणार आहे, की प्रामाणिकपणे मतदान करून ही या पद्धतीने आमची बदनामी केली जाणार असेल तर हे योग्य नाही. आम्ही पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडी सरकार सोबत आहोत. आम्ही लोकांमधून निवडून आलो आहोत. त्यामुळे आमच्या बद्दल असा गैरसमज निर्माण करणे योग्य नाही.

विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच अपक्षांना एकत्रित येऊन एक भूमिका घ्यावी लागेल. विचार करावा लागेल. हा एकट्या अपक्षावर दाखवलेला अविश्वास नाही. तर सर्व अपक्षांवर दाखवलेला अविश्वास आहे. मी भाजपला मतदान कधीच करणार नाही. असंही भुयार यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कधीच भेटत नाही. अनेक पत्र लिहूनही उत्तर देत नाही. हे आम्ही मुख्यमंत्र्यांनाही सांगितलं आहे. मतदारसंघाची काम आम्ही राज्याचा प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांना नाही. तर मग काय पंतप्रधान मोदींनी जाऊन सांगणार का, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री आम्हाला वेळ देत नाही ही आमची खंत असल्याची भावनाही देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com