
डोंबिवली : हिंदूत्व आणि विकास या दोन विषयांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे एकत्र आले आहेत. याच विचारांवर ते राज्याला एक नंबरवर नेतील. हेच विचार आपल्याला देखील पुढे घेऊन जायचे आहेत. फडणवीसांनी त्यांच्या वागणूकीतून पक्षासाठी त्याव समर्पण भावनेचा आदर्श घालून असून आपण त्याच आदर्शावर एक कार्यकर्ता म्हणून वाटचाल करणे आवश्यक आहे. मी पक्षाचा कार्यकर्ताच असून जबाबदारीने मी मोठा झालो आहे, असे मत आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी डोंबिवली येथे काढले. (MLA Ravindra Chavan Latest Marathi News Dombivli)
राज्यात शिंदे व भाजप (BJP) सरकार स्थापन झाल्यानंतर आमदार चव्हाण हे पहिल्यांदाच डोंबिवलीत आले होते. भाजपा आणि शिंदे यांच्यातील समेट मध्ये आमदार चव्हाण यांचा मोठा वाटा असून त्यांचे कौतुक आज डोंबिवलीत भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आले. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्याच्या दिवसापासून आमदार रविंद्र चव्हाण हे देखील डोंबिवलीतून नॉट रिचेबल झाले होते. तेव्हापासून आमदार चव्हाण कोठे आहेत याचीच चर्चा शहरात रंगली होती. सुरत, गुवाहाटी, गोवा त्यानंतर मुंबई अशा प्रवासात एकनाथ शिंदे बरोबरील बंडखोर आमदारांसोबत आमदार चव्हाण होते.
मुख्यमंत्री शिंदे व भाजपला एकत्र आणण्यात फडणवीसांचे निकटवर्तीय चव्हाण यांचा मोठा वाटा असल्याचे बोलले जात होते. अखेर शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आमदार चव्हाण हे पहिल्यांदाच आपल्या मतदार संघात परतले होते. पक्षाने दिलेली जबाबदारी चोख बजावून दिलेले काम मार्गी लावून चव्हाण डोंबिवलीत परतल्याने भाजपा कल्याण जिल्हा कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. माजी आमदार नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, नंदू परब यांसह राहूल दामले, मंदार हळबे, संदीप माळी, मनीषा राणे, मंदार टावरे, रेखा चौधरी, राजन चौधरी यांसह अनेक माजी नगरसेवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पक्षाने जबाबदारी दिल्यानंतर ती तन मन धनाने पूर्ण करणे हेच एक कार्यकर्ता म्हणून ध्येय ठेवले. सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेतील एक छोटी जबाबदरी मला दिली आणि त्या जबाबदारीने मला मोठं केलं असं फार तर मी म्हणेन, असे प्रतिपादन आमदार चव्हाण यांनी केले. संयम हीच भाजपा कार्यकर्त्याची खरी ताकद असून सत्तेमुळे जबाबदारीचे भान ठेवा, असा सल्ला चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला. नरेंद मोदीजींना आपल्याला पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करायचे आहे. त्यामुळे समर्पण भावनेने पक्षाची आणि जनतेची कामे करत रहा असेही चव्हाण म्हणाले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.