साटम यांचे राऊतांना खुलं आव्हान ; वेळ अन् जागा सांगा, मग आमची ताकद पहा!

घरात घुसायची भाषा करता पण स्वत:च्या घरात तुमची किती किंमत आहे हे आम्हाला चांगलं माहित आहे,'' असा टोला साटम यांनी हाणला.
Amit Satam,sanjay raut
Amit Satam,sanjay rautsarkarnama

मुंबई : संजय राऊत (sanjay raut)यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu)यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी ईडी आणि भाजप नेत्यावर गंभीर आरोप केले आहेत. यावरुन आता राजकारण पेटलं आहे. ''आम्ही घरात घुसलो तर तुम्हाला नागपुरलाही जाता येणार नाही,'' असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप नेत्यांना दिला आहे. याला भाजप नेत्यांनी प्रतिउत्तर दिलं आहे.

राऊतांच्या या विधानावर भाजपचे नेते, आमदार अमित साटम (Amit Satam)यांनी राऊतांवर टीकास्त्र डागले आहे. साटम यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून राऊतांवर टीका केली आहे. ''

राऊत मुंबई ही तुमची जहागिर नाहीये. घरात घुसायची भाषा करता पण स्वत:च्या घरात तुमची किती किंमत आहे हे आम्हाला चांगलं माहित आहे,'' असा टोला साटम यांनी हाणला.

'अमित साटम म्हणाले, ''महाविकास आघाडी सरकारमध्ये तुमची लायकी ही फक्त खलिता वाहणाऱ्या काशिदाची आहे. भ्रष्टाचार करायचा आणि तो बाहेर काढला की किरिट सोमय्या यांच्यावर भेकड हल्ले करायचे. आणि आता प्रविण राऊत यांना अटक झाल्यामुळे साहाजिकच तुमचे मानसिक संतुलन बिघडलेले आहे.. हे आम्हाला ठाऊक आहे,''

''हुल्लडबाजी ही भाजपची संस्कृती नाही. पण तुमच्या सारख्यांना तुमच्याच भाषेत बोलायचे तर तुम्ही एकदा प्रशासनाला बाजूला ठेवा, वेळ आणि जागा सांगा, मग भाजप कार्यकर्त्यांच्या मनगटातली ताकद पहा,'' असे आव्हान साटम यांनी राऊतांनी केलं आहे.

सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut)यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu)यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

या पत्रात संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. ''सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे संजय राऊत यांनी नायडू यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

Amit Satam,sanjay raut
शेतकऱ्याच्या मुलींनी अडवली धनंजय मुंडेंची गाडी ; म्हणाल्या, 'न्याय द्या'

सरकार पाडण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून मध्यावधी निवडणूका पार पाडल्या जातील. मात्र, मी याला नकार दिला. राज्यात मध्यावधी निवडणूक करण्यास मदत करण्यास नाकारले तर तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली. माझ्या या नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती, असेही संजय राऊत यांनी त्या पत्रात म्हटलं आहे.

Amit Satam,sanjay raut
ईडीकडून सरकार पाडण्याची ऑफर ; राऊतांचा खळबळजनक दावा, उपराष्ट्रपतींना पत्र

2012-2013 मध्ये मला आणि माझ्या कुटुंबाला अशीच छोटी जमीन विकणाऱ्या इतर लोकांसोबतही हे घडत असल्याचे त्यांनी सांगितले. दिवसेंदिवस ईडी आणि इतर एजन्सींचे कर्मचारी या लोकांना फोन करतात आणि त्यांना तुरुंगात टाकण्याची आणि त्यांची वैयक्तिक मालमत्ता जप्त करण्याची धमकी देत असल्याचे संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com