MLA Abu Azami News : "हिंदू समाजाच्या पत्रकामुळे समाजात द्वेषाचं वातावरण"; आझमींचं गृहमंत्रालयाला पत्र!

MLA Abu Azami News : ही पत्रके समाजात, धर्मा-धर्मात द्वेष पसरवत आहेत...
MLA Abu Azami News :
MLA Abu Azami News :Sarkarnama

Mumbai News : समाजवादी पक्षाचे (Samajwadi Part ) नेते व आमदार अबू आझमी (MLA Abu Azami) यांनी आता हिंदू समाजाकडून काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या संबंधातील पत्रकावर आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी महाराष्ट्राच्या गृहविभागाला (Home Ministry) पत्र लिहून, याबाबत गंभीरपणे दखल घेण्याबाबत मागणी केली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा अबू आझमी आणि हिंदू समाज मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार जुंपण्याची शक्यता आहे.

MLA Abu Azami News :
Ajit Pawar : अजित पवारांचा बारामतीकरांना शब्द; मी राष्ट्रवादी सोडून जाणार नाही...

आमदार आझमी यांनी गृहविभागाला लिहलेल्या पत्रात म्हंटले आहे की, सकल हिंदू समाजाच्या नावाने वितरित करण्यात आलेल्या पत्रकांबाबत मला आक्षेप आहे. ही पत्रके समाजात, धर्मा-धर्मात द्वेष पसरवत आहेत, असे आझमींचा दावा आहे. यामुळे याबाबत गृहमंत्रालयाने योग्य ती पावले उचलावीत असा, आझमींनी म्हंटले आहे.

MLA Abu Azami News :
APMC Pune News : पुणे बाजार समिती; अजितदादांच्या पॅनेलला सर्वपक्षीयांचे आव्हान !

लव्ह जिहाद आणि लँड जिहाद विरोधात मुंब्रामध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा होणार आहे, अशा आशयाचे पत्रकं वितरीत करण्यात आली आहेत. याबाबत वाटण्यात आलेली पत्रकांमुळे हिंदू आणि मुस्लिम समाजात दुरावा निर्माण होत आहे, अशी पत्रक वाटू नये, अशी ताकीद देण्यात यावी, अशी मागणी अबू आझमी यांनी केली आहे.

MLA Abu Azami News :
Nandgaon APMC election : समीर भुजबळ आमदार सुहास कांदे यांची कोंडी करतील?

पत्रकामध्ये रविवार ३० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता डायघर गाव, डी के वास महाराज क्रिडांगण, मुंब्रा या ठिकाणी हिंदू समाजाला एकत्रित जमण्याचे आवाहन पत्रकातून केले आहे. मात्र आयोजकांचे नाव, तसेच सकल हिंदू समाजाचे नेत्यांची नावांचा उल्लेख या पत्रकांमध्ये केलेला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com