सर्वसामान्यांचे सोडा; मंत्र्यांच्या घरातीलही `बत्ती गुल`

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या `बेस्ट` (BEST) च्या वाहिन्यांत बिघाड
मंत्रालय
मंत्रालयसरकारनामा

मुंबई : राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीच्या (Maharashtra Cabinet) वेळी वीज जाण्याच्या प्रकारानंतर राज्यातील मंत्र्यांना दुसरा झटका बसला आहे. बेस्ट (BEST) उपक्रमाच्या पुरवठ्यात आज तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने मंत्रालयासमोरील महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मंत्र्यांच्या बंगल्यांची वीज काही काळ बंद पडल्याने मोठी तारांबळ उडाली. बत्ती गुल झाल्याने अनेक मंत्र्यांच्या घरामध्ये अंधार झाल्याचे चित्र होते. दिवसभरात दोनदा वीज गेल्याने गोंधळ उडाला. सायंकाळी सातनंतर वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. थेट व्हीआयपी मंडळींच्या निवासस्थानीच असा प्रकार घडल्याने त्याविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह जितेंद्र आव्हाड, दादा भुसे, नीलम गोऱ्हे आदी नेत्यांची मंत्रालयासमोर शासकीय निवासस्थाने आहेत.

मंत्रालय
छत्रपती संभाजीराजेंना महाविकास आघाडीचा धक्का : शिवसेना सहावा उमेदवार देणार

बेस्ट उपक्रमाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी १० वाजता मरीन ड्राइव्ह रिसिव्हिंग स्टेशनमध्ये पहिला तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास पुन्हा बिघाड झाला. त्यामुळे मंत्रालयाजवळील परिसरात वीजपुरवठा खंडित झाला. बेस्ट उपक्रमाच्या विद्युत पुरवठा विभागाने तांत्रिक बिघाड दूर करत ६० ते ७० टक्के वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला असल्याचेही प्रवक्त्याने सांगितले. उर्वरित वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू असल्याचेही त्याने सांगितले.

बेस्टच्या दक्षिण मुंबईतील नेटवर्कमधून मंत्रालयापासून अनेक शासकीय कार्यालयांना वीजपुरवठा करण्यात येतो. त्यासोबतच मंत्रालयासमोरील कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांच्या बंगल्यातही वीज पुरवण्यात येते. आज दिवसभरात दुसऱ्यांदा या ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला.

मंत्रालय
`वैशाली नागवडेंना लगावलेली थप्पड भाजपला महागात पडणार`


दोन वेळ वीज गायब
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास दुसऱ्यांदा तांत्रिक बिघाडामुळे विजेचा पुरवठा खंडित झाला होता; पण दीड तासाने म्हणजे सायंकाळी ७ वाजता १०० टक्के वीजपुरवठा पूर्ववत झाल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे जनता संपर्क अधिकारी मनोज वऱ्हाडे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com