मंंत्रीपदाची शपथ घेतानाच मंत्र्यांना बाळासाहेबांचा पडला विसर: पेडणेकरांची टीका

Kishori Pedanekar| शिवसेनेला आई म्हणणारे मुंबईतील एकाही आमदाराला मंत्रीपद दिले नाही, ही मुंबईची शोकांतिका आहे
Kishori Pedanekar|
Kishori Pedanekar|

मुंबई : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर विरोधी पक्षांकडून आता राज्य सरकारवर टीका होत आहे. शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर, अब्दुल सत्तार आणि संजय राठोड यांच्या मंत्रीपदावरुन विरोधक टीका करत आहेत. अशात आता शिवसेना (Shivsena) नेत्या किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

व्यावसायिक मंगलप्रभात लोढा यांना मंत्रीपद दिल्याने किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर टीका केली आहे. “ बहुभाषिक मुंबईत, मराठी मुंबईत मंगलप्रभात लोढा हे विकासक आहेत, आमदार आहेत, भाजपने त्यांना मंत्रीपद दिले पण आमच्यातून गेलेले, शिवसेनेला आई म्हणणारे मुंबईतील एकाही आमदाराला मंत्रीपद दिले नाही, ही मुंबईची शोकांतिका आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले आहे.

Kishori Pedanekar|
Sharad Pawar|धनुष्यबाण शिवसेनेचा: शिंदे गटाने वाद वाढवू नये

जे मंत्री महोदय झाले त्यांचा पाळणा वेगवेगळ्या पक्षात हलला. त्यानंतर ते आमच्याकडे आले, त्यांचाही आम्ही बहुमान केला. शिवसेना आमचीच, धनुष्यबाण आमचंच, बाळासाहेब ही आमचेच असं म्हणणाऱ्यांना मंंत्रीपदाची शपथ घेताना बाळासाहेबांची आठवण झाली नाही. शपथ घेऊन 12 तासांच्यावर वेळ उलटून गेला. पण एकही आमदाराला बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन दर्शन घ्यावं, असं वाटलं नाही. याचा अर्थ फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेब वापरायचे, बाळासाहेब यांचं नाव वापरायचं. बाळासाहेबांच्या घराण्याला, ठाकरे घराण्याला संपवायचं कसं याचा विडा यांनी उचलला आहे, असा आरोपही पेडणेकर यांनी या वेळी केला.

राज्यात मंत्रिमंडळ स्थापन झाले असले नव्या सरकारमध्ये अपक्ष आणि मित्रपक्षांना सहभागी करून घेण्यात आल्याचे दिसत नाही. त्यावरुन आता राजकीय चर्चा सुरू झाल्या आहे. ‘प्रहार’ संघटनेचे बच्चू कडू यांनी आपली नाराजी उघडउघड बोलून दाखवली. ''जो उशीरा आला त्याला पहिल्या पंगतीमध्ये बसवले गेले. आणि जो पहिला गेले त्याला शेवट बसवले जात आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच, नाराजी नाही असं नाही. थोडी नाराजी तर आहेच. कारण जो उशीरा आला त्याला पहिल्या पंगतीमध्ये बसवले गेले आणि जो पहिल्यांदा गेला त्याला शेवट बसवले जात आहे. पण राजकारणात थोडं कमी जास्त होत असते, असंही बच्चु कडू यांनी म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com