नाशिक अनाथाश्रमातील मुलींच्या लैंगिक छळ प्रकरणी मंत्री लोढांनी सचिवांना दिला सात दिवसांचा अल्टिमेटम

Crime News : या घटनेचा सोशल मिडियावरून नागरिक संताप व्यक्त करत आहे.
MangalPrabhat Lodha Latest News
MangalPrabhat Lodha Latest NewsSarkarnama

मुंबई : दिल्ली येथील श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर संपूर्ण देशभर संतापाचे वातावरण असतांना नाशिकमध्ये देखील संतापजनक घटना समोर आली आहे. नाशिक येथील अनाथ आश्रमाच्या संचालकाने आश्रमातील सहा अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याची घटना घडली आहे.

दरम्यान या प्रकरणाची महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांनी दखल घेतली असून या प्रकरणीची चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश खात्याच्या प्रधान सचिवांना दिला आहे. (MangalPrabhat Lodha, Nashik Crime Latest News)

MangalPrabhat Lodha Latest News
Bawankule : बावनकुळे म्हणाले, आदित्य म्हणजे सोन्याच्या चमचाने दूध प्यालेलं बाळ...

या संदर्भातील बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये चांगल्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. लोढा यांनी या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत सखोल चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यास सचिवांना सांगण्यात आले आहे. या प्रकरणाचा सात दिवसांत चौकशीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश लोढा यांनी दिले आहेत.

MangalPrabhat Lodha Latest News
Sushma Andhare : नीतू, तुझा अभ्यास फारच कच्चा : अंधारेंनी पुन्हा डिवचलं

दरम्यान, श्रद्धा वालकरच्या हत्येनंतर संपूर्ण देशभर संतापाचे वातावरण असतांना नाशिकमध्ये अनाथ आश्रम चालवणाऱ्या संचालकानेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडल्याने राज्यभरात आणि सोशल मिडियावरून नागरिक संताप व्यक्त करत आहे. या पीडित अल्पवयीन मुलीने म्हसरूळ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन पॉस्को कायद्यानंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता या घटनेची गंभीर दखल मंत्री लोढांनी घेतली असून त्यांनी आपल्या खात्याच्या प्रधान सचिवांना या प्रकरणाचा अहवाल सात दिवसात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com