माने प्रकरणी आव्हाड म्हणाले, इतक खोटं करायचं की ते उघड नागड होऊन समोर येत..

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी स्टार प्रवाह वाहिनीवर जोरदार टीका केली आहे.
Jitendra Awhad Criticize Production House
Jitendra Awhad Criticize Production HouseSarkarnama

पुणे : मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकण्यात आलेले अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांची बाजू घेत राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरुन हल्लाबोल करत स्टार प्रवाह वाहिनीवर जोरदार टीका केली आहे. माने यांना वाहिनीने पाठवलेल्या पत्राला आव्हाडांनी ट्विट करत पत्राची तारीख आणि पत्र लिहण्याच्या तारखेतील तफावत दाखवत किरण माने चुकलेले नाही, अश्या शब्दात मानेंची पाठराखण केली आहे. (Jitendra Awhad Criticize Production House)

Jitendra Awhad Criticize Production House
अन्वय नाईक आत्महत्या अन् पोलिसांच्या बदल्यांवरून देशमुखांची झाडाझडती

आव्हाड आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, किरण मानेला प्रोडक्शन हाऊस ने कुठल्याही प्रकारचे लेखी समजपत्र असे काहीही दिलेले नव्हते. हे मी स्टार प्रवाहला बोलून दाखवल्यानंतर आज किरण मानेला एक पत्र रजिस्टर पोस्टाने आलं. त्याच्यावरती रजिस्टर पोस्ट केल्याची तारीख 21 आहे आणि पत्र लिहिण्याची तारीख 13 आहे. तर, दुसऱ्या ट्विटमध्ये इतक खोटं करायचं की ते उघड नागड होऊन समोर येत. म्हणजे याचा अर्थ किरण माने चुकलेला नाही., असे ट्वीट करत प्रोडक्शन हाऊसला सुनावले आहे.

माने यांना मुलगी झाली हो या मालिकेतून काढून टाकल्यावरुन अभिनय क्षेत्रात चांगलेच वातावरण तापले होते. त्यासोबतच राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया उमटल्याचे यापूर्वीच पहायला मिळाल्या आहे. माने यांनी सोशल मीडियावर मांडलेल्या राजकीय भूमिकांमुळे त्यांना मालिकेतून काढून टाकल्याचा त्यांनी प्रोडक्शन हाऊसवर आरोप केला आहे. याबाबत स्पष्टीकरण देतांना प्रोडक्शन हाऊसकडून त्यांना मालिकेच्या सेटवरील वर्तवणुकीचं कारण देत कारवाई करण्यात आल्याचा दावा केला होता. तर त्यांना याबाबत समज देण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. यावर मालिकेतील माने यांच्यासोबत काम केलेल्या महिला सहकलाकारांनी समोर येत भूमिका मांडली होती. यानंतर आव्हाड यांनी वाहिनीला तसेच, प्रोडक्शन हाऊसला इशारा दिला होता.

यानंतर याप्रकरणी आव्हाड यांनी नुकतीच माने आणि स्टार प्रवाहचे हेड सतीश राजवाडे यांच्यासोबत या वादाबाबत चर्चा केली व बैठकीत काय घडलं त्याबद्दल पत्रकार परिषद घेत सांगितल होते. आता या प्रकरणी आव्हाड यांनी मानेंना पाठवण्यात आलेल्या पत्राचे फोटो ट्विट करत प्रोडक्शन हाऊस खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, माने या अभिनेत्यास फुले, शाहु, आंबेडकर विचारांची कास धरुन सोशल मीडियावर लिहितो, केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांबद्दल प्रश्न विचारतो म्हणून अचानक मालिकेतून काढून टाकले असल्याचे सांगत या महाराष्ट्रात दादा कोंडके, पु.ल.देशपांडे, निळू फुले या कलाकारांनी कधी टीका केली तरी त्यांच्या विचारांचा आदर करीत त्यांचा सन्मानच केला, अशी आठवण प्रोडक्शन हाऊसला आव्हाडांनी याआधी करुन दिली होती. आता आव्हाडांनी केलेल्या टीकेला प्रोडक्शन हाऊसकडून काय उत्तर येत हे बघण महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com