बंगल्यात नेऊन अभियंत्याला मारहाण : जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि जामीनही!

जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या बंगल्यात नेऊन मारहाण झाल्याचा अभियंत्याची तक्रार होती
बंगल्यात नेऊन अभियंत्याला मारहाण : जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि जामीनही!
jitendra awhadsarkarnama

ठाणे : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याप्रकरणी ठाण्यातील सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांना एप्रिल 2020 रोजी मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी तब्बल दीड वर्षांनंतर आव्हाड यांना अटक झाल्याची माहिती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली आहे. त्यांना तातडीने जामीनही मिळाला.

आव्हाड यांच्यासारख्या मंत्र्यांना मंत्रीमंडळातून काढून टाकावे अशी मागणी सोमय्या यांनी केली. तसेच या संदर्भात भाजप राज्यपालांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

jitendra awhad
'जिम कॉर्बेट' नामांतराचा निर्णय मूर्खपणाचा ; आव्हाड भाजपवर संतापले

५ एप्रिल 2020 रोजी ऐन लॉकडाऊन काळात ठाण्यात मध्यरात्री सिव्हील इंजिनिअर अनंत करमुसे यांना घरातून उचलून नेवून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील तीन पोलिस शिपायांचा सहभाग होता असे सोसायटी सीसीटिव्ही फुटेजमध्ये निष्पन्न झाले होते. कोरोना काळातही हे प्रकरण राजकीय दृष्ट्या चांगलेच गाजले आणि राज्यभर त्याची चर्चाही झाली होती.

jitendra awhad
..'त्या' प्रकरणात पोलिस अटकेत, मग आव्हाड बाहेर का? - निरंजन डावखरेंचा सवाल

याबाबत करमुसे यांनी उच्च न्यायालयात याचिका करून आव्हाड यांनाही आरोपी करण्याची मागणी केली होती. आव्हाड यांच्या बंगल्यातील त्या दिवसाचे सीसी टीव्ही चित्रीकरण तातडीने ठाणे दंडाधिकारी न्यायालयात दाखल करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला होता.

Related Stories

No stories found.