Deepak Kesarkar : नक्षलवादाचं उदात्तीकरण करणाऱ्या पुस्तकाला पुरस्कार; निवड समितीचीच होणार चौकशी

Deepak Kesarkar: राज्यात नक्षलवादाचे उदात्तीकरण होऊ शकत नाही.
Deepak Kesarkar Latest News
Deepak Kesarkar Latest NewsSarkarnama

मुंबई : राज्य सरकारच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्य वाड्मय पुरस्कार २०२१ चा प्रौढ वाड्मय अनुवादित श्रेणीतील तर्कतीर्थ लक्ष्मण जोशी पुरस्कार फ्रॅक्चर्ड फ्रीडम : तुरूंगातील आठवणी व चिंतन या पुस्तकाला जाहीर झाला आहे. मात्र, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी या पुरस्कारावर पुरस्कार जाहीर झालेल्या पु्स्तकावरच आक्षेप घेतला आहे. आणि हा पुरस्कार देणाऱ्या समितीचीच चौकशी करण्याचा आदेश दिल्यानं साहित्य वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनीच राज्य सरकारने नुकतेच जाहीर केलेल्या वाड्मय पुरस्कारांमधील फ्रॅक्चर्ड फ्रीडम : तुरूंगातील आठवणी व चिंतन या अनुवादित पुस्तकावर आक्षेप घेतला आहे. यावेळी नक्षलवादाचं उदात्तीकरण राज्यात होऊ शकत नाही असा आक्षेप घेत पुरस्कार तज्ज्ञ समितीची चौकशी करण्याचा आदेश केसरकर यांनी दिला आहे.

Deepak Kesarkar Latest News
Nana Patole : चंद्रकांतदादांना 'भीक' आणि 'लोकवर्गणी'तला फरक कळत नसावा; नाना पटोलेंचा पलटवार

केसरकर म्हणाले, साहित्यामध्ये लेखनाचे स्वातंत्र्य असते. परंतु ज्यावर बंदी आहे, ते लिहिता येत नाही. बंदी घालण्याची एक वेगळी प्रक्रिया असते. फ्रॅक्चर्ड फ्रीडम (Fractured Freedom) या पुस्तकावर बंदी नसली तरी राज्यात नक्षलवादाचे उदात्तीकरण होऊ शकत नाही. त्यामुळे यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे. चौकशीनंतर काय कारवाई करायची यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असे केसरकर यांनी यावेळी सांगितले.

पुस्तकाच्या निवडीसंदर्भात तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षांनी कुठलीही चर्चा केली नाही अथवा ही बाब निदर्शनास आणून दिली नाही. त्यामुळे या सर्वच प्रकरणाच्या चौकशीचा आदेश दिला आहे दिल्याची माहितीही केसरकरांनी यावेळी दिली.

Deepak Kesarkar Latest News
Ramdas Athawale : ठाकरे-आंबेडकर एकत्र; रामदास आठवलेंचं मोठं चॅलेंज

मात्र, लोकवाङ्मय गृह प्रकाशनाचे संपादक राजन बावडेकर यांनी शालेय शिक्षण मंत्र्यांच्या पुरस्कारावरील आक्षेपावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, फ्रॅक्चर्ड फ्रीडम : तुरूंगातील आठवणी व चिंतन या पुस्तकावर बंदी नाही, इंग्रजीमधील या पुस्तकाची तिसरी आवृत्ती संपलेली आहे. अनुवादित पुस्तकाच्या श्रेणीत त्या वर्षातील उत्तम पुस्तक असल्याने त्याला पुरस्कार मिळालेला आहे. पुस्तकावर जर बंदी नसेल तर त्यावर आक्षेप कसा काय घेतला जाऊ शकतो असा सवाल बावडेकर यांनी उपस्थित केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com