एमआयएमचे एक मत राष्ट्रवादीने वळवले : खडसे, निंबाळकरांचे टेन्शन गेले

NCP | MIM | Vidhan Parishad Election | : राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे चारही उमेदवार निवडून येण्याच्या मार्गावर
NCP | MIM
NCP | MIMSarkarnama

मुंबई : विधान परिषद निवडणुकीच्या (Legislative Council Election) पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षासाठी एकेक मत महत्वाचे झाले आहे. असे असतानाच एमआयएमचे (MIM) दोन पैकी एक मत आपल्याकडे वळविण्यास राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) यश आले आहे. एमआयएमचे धुळ्याचे आमदार फारुख शहा यांनी आपण एकनाथ खडसे यांना मतदान करणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रथम पसंतीचे उमेदवार रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे (Eknath Khadse) या दोन्ही उमेदवारांचे टेन्शन गेले आहे. (Vidhan Parishad Election Latest News)

आज संध्याकाळी आमदार फारूख शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटही घेतली. आमच्या खान्देशचे नेते एकनाथ खडसे यांना आमचे पहिले मत असणार आहे. त्यांनी खान्देशासाठी खूप चांगले केले आहे. त्यामुळे आमचे मत त्यांना असणार आहे. त्यासाठी आम्ही अजित पवारांच्या भेटीला आलो आहोत असे त्यांनी भेटीला जाण्यापूर्वी माध्यामांना सांगितले होते. (Vidhan Parishad Election Latest News)

NCP | MIM
राज्यसभेतील दगाफटका शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी; ठाकूरांकडे केले सपशेल दुर्लक्ष

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेत सध्या 53 आमदार आहेत. मात्र आमदार अनिल देशमुख आणि आमदार नवाब मलिक हे कारागृहात असून उच्च न्यायालयाने दोघांनाही मतदानाची परवानगी दिलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मतांची संख्या 51 वर आली आहे. विजयासाठीचा कोटा 26 असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला 52 मतांची गरज आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे स्वतःचे 51, अपक्ष 3 आमदारांचा पाठिंबा आहे. अशात आता एमआयएमच्या फारुख शहा यांनी पाठिंबा जाहीर केल्याने निंबाळकर आणि खडसे यांना आवश्यक मतांसहित अतिरीक्त मतांचाही कोटा पूर्ण झाला आहे. (Vidhan Parishad Election Latest News)

NCP | MIM
विधानपरिषेदची रणधुमाळी : क्रमवारीत पहिला नंबर सेनेच्या अहिरांचा; शेवटी प्रसाद लाड

मात्र निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होणार असल्यामुळे सर्वच पक्षाने खबरदारी घेतलेली आहे. आमदार फुटू नयेत यासाठी काळजी घेतली जात आहे. शिवाय मत बाद होण्याचा देखील धोका असतो, त्यामुळे प्रत्येक पक्ष विजयी कोट्या व्यतिरिक्त काही मत अतिरिक्त देणार आहेत. मात्र हा अतिरीक्त कोटा किती असणार याबाबतची माहिती आमदारांना उद्या सकाळी मतदानापूर्वीच दिली जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com