राज्यसभेच्या एका जागेसाठी पाण्यासारखा पैसा खर्च होतोय...

Rajysabha Election 2022 | BJP-Shivsena| निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी सर्व भाजप (BJP) शिवसेना (Shivsena) आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे.
राज्यसभेच्या एका जागेसाठी पाण्यासारखा पैसा खर्च होतोय...
Rajysabha Election 2022 News,

मुंबई : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी 10 जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. पण त्यापूर्वीच राज्यात पक्षांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळत आहे. निवडणुकीत कुठलाही दगाफटका होऊ नये यासाठी सर्व भाजप (BJP) शिवसेना (Shivsena) आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार आहे. (Rajysabha Election 2022 News)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बॅगा भरुन मुंबईत येण्याचे आदेश आमदारांना दिले आहे. ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांना ठेवण्यात येणार आहे. तर भाजपच्या आमदारांसाठी ताज हॉटेल बुक करण्यात आले आहे. त्याशिवाय काँग्रेसनेही त्यांच्या आमदारांसाठी पंचतारांकित हॉटेल बुक केले आहे. येत्या १० जून रोजी होणाऱ्या मतदानापर्यंत या आमदारांचा मुक्काम या हॉटेलमध्येच असेल. विशेष म्हणजे राज्यसभेचा एक उमेदवार निवडून आणण्यासाठी राज्यातील सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे आणि त्यासाठी पाण्यासारखा पैसाही खर्च केला जातोय.

Rajysabha Election 2022 News,
अखेर पंकजा मुंडे, राम शिंदेंना संधी, दरेकर, लाड अ्न भारतीय रिंगणात?

- इतकं आहे ट्रायडेंट हॉटेलचं एका दिवसाचं भाडे
सुप्रिअर रुम - सिंगल -18,500 रुपये तर डबल - 20,000
प्रिमिअम रुम - सिंगल - 22,000 रुपये तर डबल - 23,500
प्रिमिअम ओशन व्ह्यू रूम - सिंगल - 23,500 तर डबल 25,000
प्रेंसिडेंटल सूट -3 लाख रुपये

- इतकं आहे ताज हॉटेलचं एका दिवसाचे भाडे
लग्झरी रुम - 22,000 रुपये
लग्झरी ग्रॅंड(City View) - 25,000 रुपये
लग्झरी ग्रॅंड(Sea View) - 27,500 रुपये
ताज क्लब रुम - 32,000 रुपये
ग्रॅंड लग्झरी रुम - 1 लाख 6 हजार रुपये

हा सर्व हिशोब केला तर पुढच्या तीन दिवसात एका आमदारांमागे हजारो रुपये खर्च होणार आहेत. महाविकास आघाडीचे 145 आमदार, भाजपचे 115 आमदारांना या हॉटेल ठेवल्यास त्यांच्यावर होणारा खर्च हा सर्वसामान्यांच्या न परवडणारा आहे. देशात एकीकडे महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. तर जनतेने निवडून दिलेल्या या आमदारांवर लाखो रुपयांची उधळपट्टी केली जात आहे.

या निवडणुकीत पाच उमेदवार सहज निवडून येतील. पण फक्त सहाव्या उमेदवारासाठी राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधारी पक्ष कोट्यावधी रुपये पाण्यासारखे खर्च करणार आहेत. भाजपचे ३, शिवसेनेचे २ तर काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रत्येकी एक उमेदवार राज्यसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. सहाव्या जागेसाठी शिवसेना-भाजपनध्ये थेट लढत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in