अजितदादांच्या फोननंतर मिलिंद नार्वेकर अॅक्शन मोडवर; स्वत: करणार चौकशी

मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी तिरुपती मंदिराच्या अध्यक्षांशी चर्चा केली आहे
Ajit Pawar, Milind Narvekar
Ajit Pawar, Milind Narvekarsarkarnama

मुंबई : जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपती मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर (तपासणी नाका) एका वाहनात छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती असल्याने ते रोखल्यावरून महाराष्ट्रात वादाला तोंड फुटले आहे. ही घटना नेमकी कशी घडली आणि यापुढच्या काळात त्या घडू नयेत, अशा अपेक्षा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानचे विश्वस्त आणि शिवसेनेचे (Shivsena) सचिव मिलिंद नार्वेकरांकडे (Milind Narvekar) सोमवारी व्यक्त केली.

मिलिंद नार्वेकर यांनी त्यानंतरच्या काही मिनिटांनी देवस्थानचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांच्यासोबत चर्चा केली आणि या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाईचा आग्रह धरला. अशा घटनांबाबत तपासणी नाक्यावर नेमलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना खबरदारीच्या सूचनांची गरजही नार्वेकरांनी रेड्डी यांच्याकडे मांडली. या प्रकाराची गंभीर दखल घेत तातडीने चौकशीची तयारी रेड्डी आणि देवस्थानच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी दाखवली आहे. चौकशीचा अहवाल येताच तो राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि अजत पवार यांच्यापुढे नार्वेकर ठेवणार आहेत.

Ajit Pawar, Milind Narvekar
तो व्हिडीओ पाहताच अजितदादांनी साधला मिलिंद नार्वेकरांशी संपर्क

व्यंकटेश्वराच्या दर्शनसाठी जाणाऱ्या भाविकाच्या वाहनात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती असल्याने वाहन रोखून धरल्याचा 'व्हिडिओ' व्हायरल झाला. वाहनाचालकाच्या तक्रारीनंतर साहजिकच महाराष्ट्रात पडसाद उमटले आणि संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, देवस्थानावर नार्वेकर हे विश्वस्त असल्याने या प्रकरणात त्यांनी लक्ष घालून दोषींवर कारवाईची मागणीही करण्यात आली.

त्यावरून अजित पवार यांनीही नार्वेकरांना फोन करून माहिती घेण्यास सांगितले. या फोननंतर लगेचच नार्वेकरांनी रेड्डी यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. महाराष्ट्र अन्य राज्यातून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याबाबत नियमावली करण्याची सूचना केली. तसेच, सुरक्षिततेला प्राधान्य हवेच; मात्र, किरकोळ कारणावरून वाहनचालकांशी अरेरावी होणार नाही, यादृष्टीने लक्ष देण्याची मागणी नार्वेकरांनी केली. या व्हिडिओलन महाराष्ट्रात उलटसुलट चर्चा होत आहे.

दुसरीकडे 'सोशल मीडिया' वर निषेधाचा सूर आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी विरोधकांतही आंध्रप्रदेश सरकारबाबत नाराजी दिसत आहे, त्यामुळेच शिंदे, फडणवीस यांच्याशी बोलून असे प्रकार घडणार नाहीत, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले. नार्वेकरांपाठोपाठ देवस्थान समितीवर असलेले महाराष्ट्रातील अमोल काळे, राजेश शर्मा आणि सौरभ बोरा या विश्वस्तांनीही रेड्डी यांच्यासोबत चर्चा केली. पुढील काही दिवसांत नार्वेकर हे स्वतः रेड्डी यांची भेट घेऊन या घटनेचे गांभीर्य मांडणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.

Ajit Pawar, Milind Narvekar
शिवसेनेची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल होणे, ही शिंदे गटासाठी धोक्याची घंटा!

दरम्यान, या घटनेतील 'व्हिडिओ' व्हायरल झाला असला; तरीही नाक्यावर 'सीसीटिव्ही फुटेज तपासण्यात येणार आहे. त्याचा तपशिलही नार्वेकरांनी मागवला आहे. चौकशीच्या पहिल्या टप्प्यांत भाषेवरून हा गोंधळ झाल्याचा खुलासा देवस्थानचे अधिकारी-कर्मचारी करीत आहेत. त्यापलीकडे जाऊन चौकशीसाठी नार्वेकरांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कारवाईची आशा वाढली आहे. नार्वेकर आणि रेड्डी यांच्यातील चर्चेनंतर मात्र अशा घटना थांबणार असल्याचे सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in