शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना मातृशोक; बुधवारी अंत्यसंस्कार

Milind Narvekar | Shivsena :
Vidya Keshav Narvekar
Vidya Keshav NarvekarSarkarnama

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे विश्वासु सहकारी आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या मातोश्री विद्या केशव नार्वेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. आज रात्री लिलावती रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा मिलिंद, कन्या रुपाली चाफेकर, सून प्रा.मीरा नार्वेकर आणि मोठा आप्तपरिवार आहे. (Milind Narvekar mother Vidya narcekar passed away)

विद्या नार्वेकर यांच्या निधनाचे वृत्त समजताच उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिलिंद नार्वेकरांचे सांत्वन केले. मिलिंदजी नार्वेकर यांच्या मातोश्रींचे निधन झाल्याची बातमी कळली. मिलिंदजींचे त्यांच्या आईवर अतोनात प्रेम होते, त्यांच्या जीवनात मातृप्रेमाची पोकळी निर्माण झाली आहे ती कधीही भरून न येणारी आहे. त्यांना हे दुःख सहन करणयाची ताकद ईश्वराने द्यावी, अशा शब्दात ट्विट करुन माजी मंत्री उदय सामंत यांनी मिलिंद नार्वेकरांचे सांत्वन केले.

दरम्यान, उद्या (बुधवारी) दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रेसिडेंन्सी डेक्कन, खार दांडा रोड, पाली हिल, वांद्रे पश्चिम येथील नार्वेकर कुटुंबीयांच्या घरी पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता येणार आहे. त्यानंतर सांताक्रुज पश्चिम येथील स्मशानभूमीत पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती नार्वेकर कुटुंबीयांच्या वतीने देण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com