Shiv Sena : शिंदे-ठाकरे गटासह राजकारणात सर्वांनाच मिलिंद नार्वेकर हवेहवेसे का वाटतात ?

Milind Narvekar : नार्वेकरांचे ठाकरेंच्या दुसऱ्या पिढीशी जमत नसल्याची चर्चा असतानाच आदित्य यांनी हजेरी लावणे महत्वाचे आहे.
eknath shinde , Milind Narvekar
eknath shinde , Milind Narvekarsarkarnama

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल (गुरुवारी) शिवसेना (shiv sena) सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्या निवासस्थानी भेट देऊन नार्वेकरांच्या गणपतीचे दर्शन घेतले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठाव केल्याने ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांवर अनेकदा अपशब्द किंवा आक्षेपार्ह भाषेत टीका केली. मात्र, राजकीय मतभेद बाजूला ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणाऱ्या मिलिंद नार्वेकर यांच्या घरी जाऊन नार्वेकर कुटुंबियांची भेट घेतली व गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे खास सहकारी ,सेनेच्या ठाकरे गटाचे सचिव मिलिंद नार्वेकर राजकारणात सर्वांनाच हवेसे वाटतात, अशी चर्चा सुरु आहे. गणपतीदर्शनाला त्यांच्या निवासस्थानी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह सर्व नेत्यांनी लावली आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षांना नार्वेकर हवे असल्याचे मत राजकीय वर्तुळात व्यक्त केले जाते आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या घरी काल आज आवर्जून हजेरी लावली.कोणतीही पूर्वसूचना न देता शिंदे संध्याकाळी नार्वेकरांकडे दाखल झाले असे समजते. ठाकरे यांची सावली म्हणून वावरणाऱ्या नार्वेकर यांना सेनेचा प्रत्येक कार्यकर्ता माहित आहे. महाराष्ट्रभर पसरलेल्या या कार्यकर्त्यांची शक्तीस्थाने ,दुखणी माहित असलेले नार्वेकर आपल्यात यावे असे शिंदेंना वाटते काय असे विचारले जाते.

eknath shinde , Milind Narvekar
Ajit Pawar : राज्यातील सत्तांतराचा बारामतीच्या विकासावर परिणाम होणार नाही

शिंदे आणि नार्वेकर यांनी उध्दव यांच्यासाठी अनेक मोहिमा राबवल्या आहेत. त्यांची साथ फायद्याची असे नार्वेकरांना वाटू शकते किंवा मातोश्रीची कवाडे उघडी करायला या नेत्याचा उपयोग होवू शकतो. हे दोन वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात असतानाच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या आई रश्मी यांच्यासह दर्शनाला हजेरी लावली होती.

नार्वेकरांचे ठाकरेंच्या दुसऱ्या पिढीशी जमत नसल्याची चर्चा असतानाच आदित्य यांनी हजेरी लावणे महत्वाचे आहे. त्यातच भाजपचे मुंबई शहराचे प्रमुख आशीष शेलार यांनीही नार्वेकरांच्या घरी हजेरी लावली. नार्वेकरांची आईचे काही दिवसापूर्वी निधन झाल्याने या वर्षी त्यांच्या घरच्या दीड दिवसांच्या गणपतीचे निमंत्रण त्यांनी कुणालाही पाठवले नव्हते मात्र तरीही नेत्यांनी तिथे हजेरी लावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com