'तो' फोटो माध्यमात व्हायरल झाल्याने टि्वट केले, म्हात्रेंचं स्पष्टीकरण

Shital Mhatre : राष्ट्रवादीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अवमान केला. मुख्यमंत्र्याची प्रतिमा मलीन केली."
Shital Mhatre
Shital MhatreSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलेला मॉर्फ फोटो शिंदे गटाच्या नेत्या शितल मात्रे (Shital Mhatre) यांनी ट्वीट केला. यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे. यावर आता म्हात्रे यांनी प्रतिक्रिया दिली. "तो फोटो समाज माध्यमात व्हायरल होत असल्यामुळे मी तो फोटो ट्वीट केला," असे म्हात्रे यांनी स्पष्टीकरण दिले. (Latest Marathi News)

म्हात्रे म्हणाल्या की, सुळे यांचा तो फोटो समाज माध्यमात व्हायरल होत होता, म्हणून माझ्याकडून तो फोटो ट्वीट केला गेला. मात्र राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडूनही खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो समाज माध्यमात व्हायरल केला गेला. या फोटोसाबत लिहलेला मजकूर मॉर्फ आहे. यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही अवमान झाला. राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्याची प्रतिमा मलीन केली."

Shital Mhatre
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवरुन राजकारण पेटलं ; राष्ट्रवादी शिंदे गटाचं सर्व कसं OK करणार, पोलिसात तक्रार

यावेळी म्हात्रे यांनी याप्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरबाबत आपली भूमिका सांगितली. माझ्यावर राष्ट्रवादीकडून पोलिसात तक्रार दाखल झाली आहे, यावर वकीलांचा सल्ला घेऊन आम्ही कायदेशीर उत्तर देणार, असं त्या म्हणाल्या.

Shital Mhatre
Dasara Melava : शिवसैनिकांनो.. वाजत-गाजत, गुलाल उधळत या !

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी रविकांत वरपे यांनी सुळे यांचे मॉर्फ फोटे ट्वीट केल्यामुळे म्हात्रे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. वरपे ट्वीट करत म्हणाले की, "आमच्या नेत्या आदरणीय खा. सुप्रियाताई सुळे यांचे फोटो मॉर्फिंग करून, ते ऑनलाईन पद्धतीने प्रसारित करून त्यांची बदनामी करण्याचा गुन्हा मिंध्ये सेनेच्या शीतल म्हात्रे यांनी केला आहे. आता शीतल म्हात्रे गोईंग टू जेल! चक्की पिसींग, चक्की पिसींग और चक्की पिसींग."

यावरून आता शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातला हा वाद अधिक तीव्र होण्याचे चिन्हे दिसत आहेत. म्हात्रे यांच्या प्रतिक्रियेनंतर आता वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांच्या फोटोसाबत लिहलेला मजकूरावर आक्षेप घेत, त्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न शिंदेगटाकडून होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com