'हॉटेलवर असताना आमदारांना धमक्यांचे निरोप'; संजय राऊतांचा खळबळजनक खुलासा

Sanjay Raut Latest news| आज विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
'हॉटेलवर असताना आमदारांना धमक्यांचे निरोप'; संजय राऊतांचा खळबळजनक खुलासा
Sanjay Raut Latest news|

मुंबई : 'महाविकास आघाडीची किती एकजूट आहे हे आज संध्याकाळी कळेल. पण महाविकास आघाडीचे आमदार हॉटेलवर असताना आमदारांना धमक्यांचे निरोप येत होते. आमच्या समोरसुद्धा हे घडले आहे,' असा खळबळजनक दावा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. आज विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे.

आम्हाला धोका आहे आणि समोरच्याला धोका नाही का? असा सवाल उपस्थित करत राऊत म्हणाले की, 'आमचे आमदार पक्षाच्या कँम्पमध्ये असतानाही त्यांच्यावर दबावाचे धमक्यांचे निरोप येत होते. पण आता त्याचा आमच्यावर काहीही परिणाम होणार नाही. ही लोकशाही आहे. पण लोकशाहीला काही मालक निर्माण झाले असले तरी आम्ही त्यावर मात करु. आम्ही महाराष्ट्र पुढे घेऊन जाऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. आजची निवडणूक आमच्यासाठी महत्वाची आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Sanjay Raut Latest news|
एक देवेंद्र फडणवीस हे 35 मतांच्या इतके किंमतवान ; प्रसाद लाड

विधान परिषदेच्या दहा जागांसाठी विधान भवनात मतदान सुरु आहे. महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे आणि भाजपाचे आमदार या निवडणुकीत आमचेच उमेदवार निवडून येणार असा दावा करत आहेत. तसेच, पण कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सतर्क असल्याचे दिसून येत आहे.असे असताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक विधान केले आहे.

राज्यसभा निवडणूकीत राज्यसभा निवडणुकीत काही लोकांनी लबाडी केल्यामुळे गडबड झाली. पण आता विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी तसेच त्यांचे सर्व समर्थक आमदार एकत्र आहेत. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांची एकजूट किती आहे हे संध्याकाळी समजून येईल, महाविकास आघाडीचे सर्व अधिकृत उमेदवार निवडून येतील ” असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in