
मुंबई - शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल ( रविवारी ) अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज राऊतांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीवर बंडखोर आमदार दीपक केसरकर ( Deepak Kesarkar ) यांनी टीका केली आहे. ( Meets Rauta's family then why didn't he meet Yamini Jadhav, Bhavna Gawli: Kesarkar criticizes Uddhav Thackeray )
दीपक केसरकर म्हणाले की, जर संजय राऊत दोषी आढळले असतील तर त्यांना कस्टडी दिली जाईल. आम्ही त्यांना अटकेची मागणी कधीही केली नाही. त्याचे चुलत भाऊ मागील वर्ष भरापासून तुरुंगात आहेत. चौकशी सुरू असतात तेव्हा पुरावे बदलण्याचा प्रयत्न करू नये त्यांची क्लिप व्हायरल झाली त्यात ते ईडीला जो जवाब दिला तो बदलण्यास सांगत आहेत. बिल्डरला रोखण्याचे काम या कारवाईतून होत आहे, असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, केवळ राजकीय व्यक्तीवर कारवाई झाली असे नाही. जे निर्दोष असतील त्यांनी पुरावे सादर करावे. या पूर्वी भावना गवळी, यामिनी यादव आदींनी पुरावे सादर केल्यामुळेच त्यांच्यावरील कारवाई थांबली. राऊतांच्या घरी जाणारे उद्धव ठाकरे हे यामिनी जाधव, भावना गवळी यांच्यावरील कारवाईनंतर भेटायला गेले नाहीत. यामिनी जाधव व भावना गवळी यांनी स्वतःलाच ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागले. सुनील राऊत यांनी तिथेच राहिले पाहिजे त्यांना बाकी कुणी घेणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
आमच्या कॅबिनेटचा लवकर विस्तार होणार आहे. त्यांनी कुठल्या तरी पक्षात यावे म्हणून त्यांच्यावर कारवाई झाले असे बिलकुल नाही. त्यांना फक्त राष्ट्रवादी प्रवेश देऊ शकत बाकी कोणीही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
जे.पी. नड्डा यांनी महाराष्ट्रातील शिवसेना संपल्याचे वक्तव्य केले होते. यावर केसरकर यांनी सांगितले की, राज्यात फक्त भाजप-सेना युती आहे. त्यामुळे ते म्हणाले असतील की महाराष्ट्रयात भाजप सेना राहणार. ज्या शिवसेनेने त्यांना फसवलं त्यांच्याबद्दल त्यांचे म्हणणे असेल, असा खुलासाही त्यांनी केला.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.