गुरूदक्षिणा म्हणून राष्ट्रवादीच्या मुंबईतील जागा वाढवा : भुजबळांचे आवाहन शिवसेनेला टोचणारे...

राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) मुंबईमध्ये पदाधिकारी मेळावा
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

मुंबई : आज गुरुपौर्णिमा आहे, या दिवशी सर्वांनी एकच निर्धार करा आणि पवार साहेबांना गुरूदक्षिणा म्हणून मुंबई (Mumbai) शहरात आपल्या नगरसेवकांची संख्या वाढवून दाखवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी पदाधिकाऱ्यांना केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत मुंबईत विभागीय पदाधिकारी आढावा बैठक यशवंतराव चव्हाण सेंटर येथे घेण्यात आली, यावेळी भुजबळ बोलत होते. (Ncp Latest Marathi News)

या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष राखी जाधव, अजित पवार, एकनाथ खडसे, कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण, माजी खासदार माजीद मेमन, राष्ट्रीय सचिव नरेंद्र वर्मा, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, मुंबई विभागीय महिलाध्यक्ष सुरेखा पेडणेकर, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले, सुनील शिंदे, सोहेल सुभेदार, विजय वाडकर, रमेश परब, धनंजय पिसाळ, अजित रावराणे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Chhagan Bhujbal
केसरकरांना शिवसेनेचा इतिहास माहिती नाही; पवारांनी शिवसैनिकांचा स्वाभिमानच जपला...

या वेळी भुजबळ म्हणाले, मुंबई शहरात पाणी, मीटर, सांडपाण्याचा निचरा असे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांकडे आपल्या पदाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ते सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला पाहिजे. शरद पवार पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, शेवटच्या कार्यकर्त्याला शक्ती देऊन त्याची प्रतिष्ठा कशी राखली जाईल, हा प्रयत्न करण्यासाठी काल राज्यव्यापी आणि आज मुंबई विभागीय कार्यकारिणीची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापली मते दोन्ही दिवसाच्या बैठकीत मांडली आहेत. यापुढे आपल्याला एकच काम करायचे आहे ते म्हणजे संघटना वाढवून ती बळकट करायची आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत सक्रीय सहभाग नोंदवण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

जयंत पाटील म्हणाले, मुंबईत आपला पक्ष वाढविण्यासाठी अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करतो आहोत. पक्षनिष्ठा ठेवून काम करणारे बोरिवलीपासून कुलाब्यापर्यंत प्रयत्न करत आहेत. राजकारणाच्या दृष्टीने महाराष्ट्रात मुंबई शहर हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण शहरात स्वतंत्र फादर बॉडी तयार केली आहे. आपण अधिक सतर्कपणे प्रत्येक वॉर्डमध्ये पक्षाचा उमेदवार देणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याला सातत्याने लोकांमध्ये जाऊन संवाद साधला पाहिजे. यासाठी सर्वांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. याद्वारे पक्षाची भूमिका प्रकर्षाने मांडण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

Chhagan Bhujbal
शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? फडणवीसांनी दिली नवी तारीख

खासदार सुळे म्हणाल्या की ''पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी केलेल्या कामाची दखल संपूर्ण देशाने घेतली. नवाब भाई यांनी केंद्र सरकारची केलेली पोलखोल अतिशय उल्लेखनीय होती. त्यांचा आवाज दाबण्यासाठी केंद्राने त्यांना निष्कारण त्रास देण्याचा डाव आखला आहे. आपण विरोधात असतो तेव्हा काम सोपे असते. सत्ताधारी हे नेहमीच नवनवीन मुद्दे देत असतात. त्यावर आवाज उठवणे आपली जबाबदारी आहे. यासाठी कोणताही मुहूर्त लागत नाही. बेरोजगारी, महागाई अशा सर्व मुद्द्यांवर लोकशाहीच्या माध्यमातून रस्त्यावर उतरून त्याविरोधात आवाज उठवा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in