जरंडेश्वरचे संचालक किरीट सोमय्यांच्या भेटीला; गुरू कमोडिटीसह बँकांवर कारवाईची केली मागणी 

जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदेशीर विक्री व्यवहारास जबाबदार असणाऱ्या गुरु कमोडिटी प्रा.लि. ,जरंडेश्वर शुगर प्रा.लि. ,राज्य सहकारी बँकेच्या ,इतर जिल्हा सहकारी बँकांच्या पदाधिकारी व अधिकारी वर्गावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या संचालकांनी केली आहे.
जरंडेश्वरचे संचालक किरीट सोमय्यांच्या भेटीला; गुरू कमोडिटीसह बँकांवर कारवाईची केली मागणी 
To meet Kirit Somaiya, Director, Jarandeshwar; Demand for action against banks including Guru Commodity

सातारा : जरंडेश्वर कारखान्याच्या बेकायदेशीर विक्री व्यवहारास जबाबदार असलेल्या गुरू कमोडिटी प्रा. लि., जरेंडेश्वर शुगर प्रा. लि. राज्य सहकारी बँकेसह इतर जिल्हा बँकांच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करावी. तसेच कारखाना सभासदांच्या मालकीचा होऊन तो तातडीने सुरू व्हावा, या मागणीसाठी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी राज्यसभेचे खासदार व भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. To meet Kirit Somaiya, Director, Jarandeshwar; Demand for action against banks including Guru Commodity

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जरंडेश्वर साखर कारखान्यावर केंद्र शासनाने ई. डी. च्या माध्यमातून जप्ती कारवाई केली आहे. ई. डी.च्या माध्यमातून जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्यात आला आहे. जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या बेकायदेशीर विक्री व्यवहारास जबाबदार असणाऱ्या गुरु कमोडिटी प्रा.लि. ,जरंडेश्वर शुगर प्रा.लि. ,राज्य सहकारी बँकेच्या ,इतर जिल्हा सहकारी बँकांच्या पदाधिकारी व अधिकारी वर्गावर लवकरात लवकर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या संचालकांनी केली आहे. 

तसेच जरंडेश्वर साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा होऊन तो तातडीने सुरु व्हावा. या मागणीसाठी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी राज्य सभेचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते किरीट सोम्मया यांची मुंबई येथे त्यांच्या निवासस्थानी जावून समक्ष भेट घेतली. यावेळी जरंडेश्वर बाबतीत सविस्तर चर्चा झाली. यावेळी किरीट सोम्मया यांच्यासोबत जरंडेश्वरचे उपाध्यक्ष सापतेभाऊ, शंकरराव भोसले, कार्यकारी संचालक किसनराव घाडगे, संचालक पोपटराव जगदाळे उपस्थित होते. 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in