Hindu Mahasabha : हिंदू महासभा 'या' शहराचे नाव 'नथुराम गोडसे नगर' करणार

Hindu Mahasabha : हिंदू महासभेनं जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात देशाला हिंदू राष्ट्र बनवणे हे प्रधान्य असल्याचं स्पष्ट केले आहे.
Meerut Hindu Mahasabha latest news
Meerut Hindu Mahasabha latest news sarkarnama

Meerut : मेरठ महापालिकेची (Meerut city) निवडणूक लवकरच होणार आहे. या निवडणुकीत हिंदू महासभा नगरसेवक पदासाठी उमेदवार उतरवणार आहे.हिंदू महासभेने (Hindu Mahasabha)आपला जाहीरनामा सादर केला आहे. यात मेरठ शहराचे नाव बदलण्याचे (Nathuram Godse Nagar) आश्वासन देण्यात आले आहे. (Hindu Mahasabha latest news)

हिंदू महासभेचा महापौर झाला तर मेरठचे नाव नथुराम गोडसे नगर असे केले जाईल, अशी घोषणा हिंदू महासभेनं केली आहे. यासोबतच शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मुस्लिम नावांना बदलून हिंदू महापुरुषांची नावे ठेवण्यात येणार असल्याचेही हिंदू महासभेनं जाहीर नाम्यात म्हंटले आहे.

हिंदू महासभेनं जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात देशाला हिंदू राष्ट्र बनवणे हे प्रधान्य असल्याचं स्पष्ट केलंय. तर शिवसेनेवरही हिंदू महासभेनं जोरदार टिका केलीय. मुस्लिम मतांसाठी शिवसेना तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप हिंदू महासभेनं केला आहे.

Meerut Hindu Mahasabha latest news
Bhaskar Jadhav : ठाकरे गटाच्या आमदाराला दिलासा ; अटकपूर्व जामीन मंजूर

पूर्वी भारतीय जनता पक्ष स्वतःला हिंदू पक्ष म्हणवत असे, पण आज इतर समाजातील लोकांचाही वरचष्मा आहे. त्याचप्रमाणे शिवसेनाही मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण करत असल्याचा आरोप हिंदू महासभेचे उपाध्यक्ष पंडीत अशोक शर्मा यांनी केला. या वर्षाअखेर मेरठ महापालिका होणार आहेत.यासोबतच शहर व जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या मुस्लिम नावांना बदलून हिंदू महापुरुषांची नावे ठेवण्यात येणार आहेत.

असा आहे हिंदू महासभेचा जाहीरनामा

  • भारतातील धर्मांतरासारख्या मुद्द्यांवर काम करणार

  • वाढत्या इस्लामी तुष्टीकरणाच्या विरोधात पावले उचलणार.

  • भारताला हिंदू राष्ट्र बनवणे ही पहिली प्राथमिकता.

  • गाईची काळजी घेण्यास प्राधान्य

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in