Girish Mahajan : डॉक्टर व्हायचयं ! ; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय ; नवीन पर्याय

Medical Education In Marathi : मराठीतून वैद्यकीय शिक्षण हा संपूर्ण ऐच्छिक पर्याय असणार आहे.
 Medical Education In Marathi news update
Medical Education In Marathi news updatesarkarnama

Girish Mahajan : राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (girish mahajan) यांनी डॅाक्टर होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी दिली आहे. ते माध्यमांशी बोलत होते. (Medical Education In Marathi news update)

मध्य प्रदेशात वैद्यकीय शिक्षण हे हिंदीमधून देण्याचा निर्णय तेथील राज्यसरकारने घेतला आहे. याच धर्तीवर महाराष्ट्रातही मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण सुरू होणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. यासाठी विविध तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे.

येत्या शैक्षणिक वर्षांपासून (२०२३) महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण मराठीतून उपलब्ध असणार आहे. यासाठी गेल्या काही महिन्यापासून हा अभ्यासक्रम मराठीतून बनविण्यासाठी सरकारकडून तयारी सुरु आहे.

महाराष्ट्रात मराठीतून वैद्यकीय शिक्षण मिळणार असले तरी ते बंधनकारक नसून तो पर्याय असणार आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून एमबीबीएस, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतचिकित्सा, नर्सिंग, फिजिओथेरपी यांसारखे अभ्यासक्रम शिकायला मिळणार आहे, असे महाजन यांनी सांगितले. मराठीतून वैद्यकीय शिक्षण हा संपूर्ण ऐच्छिक पर्याय असणार आहे.

नवीन शैक्षणिक धोरणाचा एक भाग म्हणून वैद्यकीय शिक्षण प्रादेशिक भाषेतून देण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.त्यानुसार आता महाराष्ट्रातही वैद्यकीय शिक्षण मराठी भाषेतून उपलब्ध केले जाणार आहे. हा भाषेत बदल झाला असला तरीही अभ्यासक्रमामध्ये कोणताही फेरफार करण्यात येणार नाही, असे समजते.

 Medical Education In Marathi news update
Tata-Airbus project : फाईल कशा फिरल्या, योग्य वेळी पुरावे देऊ ; भाजपचा देसाईंना इशारा

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भोपाळमध्ये वैद्यकीय शिक्षणाच्या हिंदी अभ्यासक्रमाचा प्रारंभ झाला आहे. वैद्यकीय शिक्षण हिंदीतून उपलब्ध करून देणारे मध्य प्रदेश हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

महाराष्ट्रात लवकरच आरोग्य विभागात येत्या काही महिन्यांत 10,127 पदांसाठी मेगा भरती (Mega Recruitment) करणार आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि लॅब टेक्निशियन अशा अनेक पदांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीची जाहिरात 1 ते 7 जानेवारीदरम्यान प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर परीक्षा आणि मुलाखतीचं वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in