MCA Election : नार्वेकरांनी घेतली दुसऱ्या क्रमांकाची मते; विजयानंतर उद्धव ठाकरेंचा फोन

ठाकरे कुटुंबीय एमसीएचे मतदार असूनही मतदानाकडे त्यांनी पाठ फिरवली होती.
 Uddhav Thackeray-Milind Narvekar
Uddhav Thackeray-Milind NarvekarSarkarnama

मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत (एमसीए MCA) अपेक्षेप्रमाणे शरद पवार (sharad Pawar)-आशिष शेलार (Ashish Shelar) गटाने बाजी मारली आहे. या गटाचे अमोल काळे एमसीएचे नवीन अध्यक्ष असतील, त्यांना १८६ मते मिळाली. या निवडणुकीत सर्वाधिक मते पवार-शेलार गटाचे सचिव पदाचे उमेदवार अजिंक्य नाईक यांना २८६ मते मिळाली आहेत, त्या पाठोपाठ शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी २२१ मते घेत विजय मिळविला. विजयानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फोन करून त्यांचे अभिनंदन केले आहे. (MCA Elections: Narvekars Get Second Number of Votes; Uddhav Thackeray's phone call after victory)

एमसीएची यंदाची निवडणूक वेगळ्या कारणासाठी चर्चेत होती. या निवडणुकीत सर्वपक्षीय राजकारणी एका पॅनेलमधून लढले, तर त्यांच्या विरोधात माजी कसोटीपटू संदीप पाटील यांनी लढत दिली. या लढतीत पवार-शेलार पॅनेलचे अध्यक्षपदाचे उमेदवार अमोल काळे हे विजयी झाले असले तरी संदीप पाटील यांनी जोरदार लढत दिली.

 Uddhav Thackeray-Milind Narvekar
अनिल देशमुखांची दिवाळी घरी की कोठडीत? उद्या होणार निर्णय...

पवार-शेलार पॅनेलकडून उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनी निवडणूक लढवली. ठाकरे कुटुंबीय एमसीएचे मतदार असूनही मतदानाकडे त्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे ते नार्वेकर यांच्या उमेदवारीवर नाराज आहेत की काय अशी चर्चा मुंबईच्या वर्तुळात रंगली हेाती. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर खुद्द पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नार्वेकर यांना फोन करून त्यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले.

 Uddhav Thackeray-Milind Narvekar
दौंडकरांसाठी मोठी बातमी : तीन हंगामानंतर भीमा-पाटस कारखाना सुरू होणार!

याबाबत नार्वेकर म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी उमेदवार होण्यासाठी परवानगी दिली. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार आणि आशिष शेलार यांनी त्याला मंजुरी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यासाठी ताकद लावली. तसेच सर्वपक्षीय नेत्यांनीही मदत केली, त्यामुळेच मी एवढी मते घेऊ शकलो. निकालानंतर उद्धवसाहेबांचा फोन आला होता, त्यांनी विजयाबद्दल अभिनंदन केले. संदीप पाटील यांना दिलेला पाठिंबा आणि त्यानंतर पवार-शेलार यांच्या एकत्र येणे यावर फक्त पवारसाहेबच बोलू शकतात, असे सांगून नार्वेकर यांनी जास्त बोलणे टाळले.

 Uddhav Thackeray-Milind Narvekar
'केंद्रीय मंत्री दानवेंच्या घराला अभय; गरीब कुंभाराचे घर मात्र रात्रीत पाडले'

एमसीएच्या निवडणुकीतील उमेदवार आणि त्यांना मिळालेली मते : अध्यक्ष : अमोल काळे (१८३ मते), सचिव : अजिंक्य नाईक (२८६ मते), खजिनदार : अरमान मलिक (१६२ मते). कौन्सिल सदस्य : मिलिंद नार्वेकर (२२१), नीलेश भोसले (२१९), कौशिक गोडबोल (२०५), अभय हदाफ (२०५), सूरज सामंत (१७०), जितेंद्र आव्हाड (१६३), मंगेश साटम (१५७ ), संदीप विचार (१५४), प्रमोद यादव (१५२), गणेश अय्यर (२१३).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com