राष्ट्रवादीला मोठ्या आनंदाच्या बातमीची शक्यता; सर्व नेत्यांचे लक्ष उच्च न्यायालयाकडे

NCP | Nawab Malik | Anil Deshmukh | : न्यायालयाच्या निरीक्षणानंतर महाविकास आघाडीच्या त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा पल्लवित
High Court | NCP
High Court | NCPSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) उद्या उच्च न्यायालयातून आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. राज्यसभा निवडणुकीपासून वंचित राहिलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना उच्च न्यायालयातून उद्या विधान परिषद निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. मतदानाची परवानगी मिळावी यासाठी या दोन्ही नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी आज पूर्ण झाली असून न्यायालय त्यावर उद्या निर्णय देणार आहे. (NCP | Nawab Malik | Anil Deshmukh latest News)

ईडीने (ED) या दोन्ही नेत्यांना मतदान करु देण्यास विरोध दर्शवला आहे. कोठडीत असलेल्या नेत्यांना मतदान करण्याचा अधिकार नसतो, असा दावा ईडीने केला. मात्र यावर उच्च न्यायालयाने काही निरीक्षण नोंदवून ईडीला सवाल केला. देशमुख आणि मलिक हे दोघेही लोकांमधून निवडून आलेले आमदार आहेत. अशावेळी त्यांना मतदानाचा हक्क नाकारणे हे ते प्रतिनिधीत्व करत असलेल्या मतदारसंघातील लोकांना मतदानापासून वंचित ठेवण्यासारखं नाही का? असा सवाल न्यायालयाने ईडीला केला. (NCP | Nawab Malik | Anil Deshmukh latest News)

दरम्यान न्यायालयाच्या या निरीक्षणानंतर महाविकास आघाडीच्या त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आशा काहीश्या पल्लवित झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभेमध्ये सध्या ५३ आमदार आहे. तर एका उमेदवारासाठी विजयाचा कोटा २७ मतांचा आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला दुसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी आणखी एका मताची गरज आहे. अशातच देशमुख आणि मलिक कारागृहात असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे टेन्शन वाढले होते. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांना मतदानाची परवानगी न मिळाल्याने महाविकास आघाडीलामोठा फटका सहन करावा लागला होता.

विधान परिषद निवडणुकीत भाजपने आणि काँग्रेसने त्यांच्या विधानसभेतील संख्याबळापेक्षा एक उमेदवार जास्तीचा मैदानात उतरवला आहे. त्यामुळे भाजपला आपला पाचवा उमेदवार निवडून आणण्यासाठी २२ मतांची तर काँग्रेसला १० मतांची गरज आहे. त्यामुळे विजयाचे गणित छोट्या पक्षाच्या आणि अपक्ष आमदारांवर अवलंबून आहे. त्याचवेळी देशमुख आणि मलिक यांना परवानगी मिळाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे टेन्शन गेले तरी आघाडीतील काँग्रेसचे टेन्शन कायम राहणार आहे. (NCP | Nawab Malik | Anil Deshmukh latest News)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com