युवा उद्योजक प्रतिक काळंगे यांची आत्महत्या ; तुकडाबंदी कायद्याचा बळी ?

pratik kalange : काही महिन्यापासून हवेली तालुक्यात अकरा गुंडे आणि त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या जमिनीच्या व्यवहाराला सरकारने बंदी घातली आहे.
pratik kalange
pratik kalange sarkarnama

पुणे : पुणे जिल्ह्यात अकरा गुंठ्याची खरेदी-विक्री जोरात सुरु आहे. हवेली तालुक्यात मात्र सरकारने तुकडाबंदी कायद्यावर बडगा उभारला आहे. दस्त नोंदणीस बंदी घातली आहे. सरकारच्या या बंदीमुळे एका युवा उद्योजकांने आत्महत्या केली असल्याचे बोलले जाते.

उरळी कांचन येथील मातोश्री डेव्हलपर्सचे मालक, प्रतिक बाळासाहेब काळंगे (वय २८) (pratik kalange)यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. प्रतिक हे काल (मंगळवारी) शेवाळवाडी (पुणे) येथे एका लॅाजमध्ये गेले होते.

आज (बुधवारी) लॅाजच्या एक कर्मचारी त्यांना उठवण्यासाठी गेला असता, त्यांनी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आढळले. लोणी, वाघोली, उरळीकांचन परिसरात प्रतिक काळंगे यांचा प्लॅाटिंगचा व्यवसाय होता.

pratik kalange
Maharashtra Assembly : आम्हाला आई-बहिणींवरुन शिवीगाळ; मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

काही महिन्यापासून हवेली तालुक्यात अकरा गुंडे आणि त्यापेक्षा कमी क्षेत्र असलेल्या जमिनीच्या व्यवहाराला सरकारने बंदी घातली आहे. त्यामुळे प्रतिक यांच्यावर आर्थिक ताण आल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे.

पूर्व हवेली तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या मुलांनी प्लॉटिंगचा व्यवसायात मोठी गुंतवणूक केली आहे. सरकारने दस्तबंदी केल्याने या परिसरातील प्लॅाटिंगचा व्यवसाय अडचणीत आला आहे. प्रतिक काळंगे यांनी सात-आठ वर्षांपासून प्लॅाटिंगच्या व्यवसायात मोठी गुंतवणुक केली होती.

या व्यवसायावर सध्या बंदी असल्याने त्यांना नैराश्य आले होते, या नैराश्यातून आत्महत्या केली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहेत. त्यांच्या कुटुंबियांकडून मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com