'आर्ची' चा भाऊ ‘प्रिन्स दादा’ ला अटक होणार ? ; मंत्रालयातील नोकरीसाठी नागराज मंजुळेंच्या नावाचा वापर

Suraj Pawar : सुरज पवार आरोपी म्हणून पोलिसांच्या रडारवर आहे.
suraj pawar latest news
suraj pawar latest newssarkarnama

-विलास कुलकर्णी

राहुरी : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे धक्कादायक प्रकार घडला आहे. नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्यात 'सैराट' (sairat) चित्रपटात प्रिन्सची भूमिका साकारलेला अभिनेता सुरज पवार (suraj pawar) याचाही समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मंत्रालयात नोकरीचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा राहुरी पोलिसांनी पर्दाफाश केला. आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. अटकेतील आरोपींनीच सुरज पवार याच्याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे सुरज पवारलाही अटक होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरज पवार आरोपी म्हणून पोलिसांच्या रडारवर आला आहे.

चित्रपट निर्माते-दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नावाचा आरोपींनी वापर केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याबाबत महेश बाळकृष्ण वाघडकर (रा. भेंडा फॅक्टरी, ता. नेवासा) यांनी फिर्याद दिली आहे. राहुरी पोलिसांना तीन आरोपींना पकडले आहे.

suraj pawar latest news
Eknath Shinde : 'वेदांता' वरुन मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना दिले सडेतोड उत्तर

सैराट मध्ये पर्शा आणि आर्ची यांच्या जोडीने देशभरातील चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. याच चित्रपटातील आर्चीच्या भावाची भुमिका साकारणारा सुरज पवार उर्फ ‘प्रिन्स दादा’ सध्या चर्चेत आला. एका फसवणुकीच्या प्रकरणात सुरजचे नाव आल्याचे समजते.

वाघडकर यांच्या फिर्यादीवरून फसवणूक करणे, बनावट शिक्के आणि दस्तऐवज तयार करणे या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी दत्तात्रय क्षिरसागर (राहणार नाशिक), आकाश शिंदे आणि ओमकार तरटे (दोघेही राहणार संगमनेर ) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

वाघडकर यांना तीन सप्टेंबर रोजी श्रीरंग अरुण कुलकर्णी या नावाने भ्रमणध्वनी आला. त्याने मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी आहे. कोरोना काळात सामाजिक न्याय विभाग, मंत्रालयात मरण पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदावर नोकरी लावून देण्याचे अधिकार असल्याचे सांगितले. मोबाईलवर शैक्षणिक कागदपत्रे मागीतली.

शुक्रवारी (ता.९) वाघडकर यांना राहुरी बस स्थानक येथे बोलावून लिपिक टंकलेखक पदाचे नियुक्तीपत्र दाखविले. दोन लाख रुपये घेतले.नियुक्तीपत्र देण्यासाठी आणखी तीन लाखांची मागणी करून, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे व्हीआयपी अतिथीगृहात बोलविले. वाघडकर यांना संशय आल्याने, त्यांनी मंत्रालयात चौकशी केली. फसवणुकीचा प्रकार असल्याचे लक्षात येताच, त्यांनी राहुरी पोलीस ठाणे गाठले.

पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी शुक्रवारी (ता.९) कृषी विद्यापीठ येथे दत्तात्रेय अरुण क्षीरसागर (३१, रा.दत्तनगर,मालेगाव बसस्थानक,नाशिक) याला अटक केली. त्याच्याकडून बनावट शिक्के, नियुक्तीपत्रं, काही कागदपत्रे जप्त केली. त्याने कुलकर्णी या खोट्या आडनावाने फोन केल्याची कबुली दिली. त्याला, राहुरी न्यायालयाने उद्या शुक्रवार (ता. १६) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तपासाची चक्रे वेगाने फिरली.

suraj pawar latest news
Sharad Pawar : राज्य समजून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची वाढलेली गती चांगली ; पवारांचा टोला

अटक आरोपीचा साथीदार आकाश विष्णू शिंदे (रा. संगमनेर) याला राहत्या घरी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यालाही शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी मिळाली. त्याने बनावट शिक्के तयार करून घेतले. नियुक्तीपत्रावर सह्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले. शिक्के बनवून दिलेला आरोपी ओंकार नंदकुमार तरटे (रा. संगमनेर) यालाही पोलिसांनी अटक केली. त्याने सामाजिक न्याय विभागाचा गोल व आडवा शिक्का बनवून दिल्याची कबुली दिली.

"शिक्के बनवून देत नव्हतो. परंतु, आरोपी शिंदे याने शॉर्ट फिल्म बनविण्यासाठी शिक्के वापरणार असल्याचे सांगितले. त्याच्यासोबत सैराट चित्रपटातील प्रिन्सची भूमिका केलेला सुरज पवार आला होता. पवारने दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्याशी बोलणे करून देतो, असे सांगून एका व्यक्तीशी बोलणे करून दिले. शिक्क्यांचा गैरवापर करणार नसल्याचे सांगितल्याने शिक्के बनवून दिले." असे आरोपी तरटे याने चौकशीमध्ये सांगितले.

"सुरज पवार उर्फ सैराट चित्रपटातील प्रिन्स याला तपासकामी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. बनावट शिक्के बनवून दिलेल्या आरोपीच्या चौकशीत प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या नावाचा वापर केल्याचे तपासात समोर आले आहे," असे , राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in