केतकी चितळे प्रकरण आता राज्यपाल दरबारी; सीबीआयची एन्ट्री होणार?

शरद पवार यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे सध्या तुरूंगात आहे.
Ketaki Chitale Latest Marathi News
Ketaki Chitale Latest Marathi NewsSarkarnama

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे सध्या तुरूंगात आहे. तिच्यावर राज्यभरात जवळपास 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे आता तिच्या वकिलांनी थेट राज्यपालांकडे धाव घेतली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी वकिलांनी केली आहे. (Ketaki Chitale Latest Marathi News)

केतकी चितळेवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसारही (अॅट्रॉसिटी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातही तिला अटक झाली होती. सध्या ती न्यायालयीन कोठडीत होती. तिला दोन आठवड्यांपूर्वी अटक करण्यात आली आहे. तिच्या आक्षेपार्ह पोस्टनंतर राष्ट्रवादीसह सर्व राजकीय पक्षांनी निषेध केला होता. ठिकठिकाणी आंदोलनेही करण्यात आली.

Ketaki Chitale Latest Marathi News
राज्यसभा निवडणूक: आमदाराने व्हीप मोडल्यास सदस्यत्व जाणार? त्याच्या मताचे काय होणार?

केतकीला अद्याप जामीन मिळालेला नाही. त्यामुळे तिच्या वकिलांनी शनिवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या प्रकरणात राज्यपाल आणि केंद्र सरकारने हस्तक्षेप करून सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. केतकीला गंभीर गुन्ह्यातील आरोपीप्रमाणे वागणूक दिली जात आहे. तिच्यावर 22 ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. पोलिसांच्या ताब्यात असताना हल्ला करणे, हल्लेखोर महिलेने केलेल्या योजनेची माध्यमांना माहिती देणे, हे सगळे नियोजनबध्द होते, असा दावा वकील योगेश देशपांडे यांनी केला आहे.

न्यायालयातही तिला जामीन नाकारला जात आहे. तिच्या कोठडीत वाढ होत आहे. हे कायद्याला धरून नाही, असंही केतकीच्या वकिलांचे म्हणणे आहे. पोलीस ठाण्यात केलेल्या मारहाणप्रकरणी तक्रारही घेतली गेली नाही. याबाबत मानवाधिकार आयोगाकडेही तक्रार केल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

केतकीवर दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्राची प्रतही वकिलांना मिळालेली नाही. राज्य सरकारकडून जाणीवपूर्व केले जात असल्याने यामध्ये केंद सरकारने हस्तक्षेप करून संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी वकिलांनी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com