तर लाभार्थी मराठा युवक मंत्र्यांना अडवून जाब विचारतील : नरेंद्र पाटील

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून महामंडळाला एक रुपयाही मिळालेला नाही, केवळ घोषणा आणि घोषणाच सुरू आहेत.'
तर लाभार्थी मराठा युवक मंत्र्यांना अडवून जाब विचारतील : नरेंद्र पाटील
Maratha youth will stop ministers and ask for answers: Narendra Patil

ढेबेवाडी : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे लाभार्थी असलेल्या मराठा युवकांची राज्य शासनाने घोर निराशा केली आहे. शासनाने तातडीने महामंडळासाठी शंभर कोटींची तरतूद न केल्यास लाभार्थी मंत्र्यांना अडवून जाब तर विचारतील. शिवाय आम्हीही तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी आज मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. Maratha youth will stop ministers and ask for answers: Narendra Patil

ते म्हणाले, 'माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीन वर्षांपूर्वी अण्णासाहेब पाटील महामंडळाला पुनरुज्‍जीवित करून त्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्याकडे दिली. राज्यातील २६ जिल्हे व 28 तालुक्यांचे दौरे करून महामंडळाच्या विविध योजनांची माहिती मी राज्यभर पोचवून २९ हजार  मराठा युवकांना उद्योजक केले.

मराठा युवकांना उद्योगासाठी जिल्हा मध्यवर्ती, सहकारी व राष्ट्रीयीकृत बँकांकडून अंदाजे दोन हजार कोटी रुपये एवढ्या कर्जाचे वाटप महामंडळामार्फत करण्यात आले आहे. या कर्जाच्या रकमेचा फक्त व्याज परतावा करण्यासाठीच महिन्याला आठ कोटी आणि वर्षाला ९६ कोटी रुपये लागतात. मात्र, आता महामंडळासाठी शासनाने साडेबारा कोटींचा निधी वितरीत करण्याचा निर्णय घेतल्याने त्यातून दोन महिन्यांचा व्याज परतावा तरी जाईल का? राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून महामंडळाला एक रुपयाही मिळालेला नाही, केवळ घोषणा आणि घोषणाच सुरू आहेत.'

Related Stories

No stories found.