मराठा क्रांती मोर्चाचा मंत्रालयात 'गनिमी कावा'

अकस्मात सुरू झालेल्या या ठिय्या आंदोलनाने प्रशासन व पोलिसांची त्रेधातिरपीट उडाली.
मराठा क्रांती मोर्चाचा मंत्रालयात 'गनिमी कावा'
Maratha Kranti MorchaSarkarnama

मुंबई : छत्रपती संभाजीराजे (Chatrapati Sambhajiraje) यांना दिलेल्या आश्वासनांची अद्यापही पुर्तता होत नसल्याने मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) समन्वयकांनी आज मंत्रालयात गनिमी काव्याने ठिय्या आंदोलन केले. राज्य सरकारने (State Government) दिलेल्या आश्वासनांची पुर्तता झाली की नाही याचा पाठपुरावा करण्यासाठी आज दहा ते बारा जणांचे शिष्टमंडळ सामान्य प्रशासन विभागाचे सचिव सुमंत भांगे यांच्या दालनात गेले होते. भांगे यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळाले नाही म्हणून संतापाच्या भरात या आंदोलकांनी त्यांच्या दालनातच ठिय्या मांडला.

Maratha Kranti Morcha
पेट्रोलच्या दरवाढीवर 'हा' उपाय केल्यास मिळेल आराम!

अकस्मात सुरू झालेल्या या ठिय्या आंदोलनाने प्रशासन व पोलिसांची त्रेधातिरपीट उडाली. या आंदोलनात अंकुश कदम, संजीव भोर, धनंजय जाधव, रघुनाथ चित्रे यांच्यासह ईसीबीसी मधून नेमणूक झालेले पण नियुक्ती न मिळालेले काही विद्यार्थी देखील सहभागी होते.मराठा समाजातील नेमणूका झालेल्या विद्यार्थ्यांना 'सुपर न्युमररी' पध्दतीने नियुक्त्या देण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याशिवाय, गुढीपाडव्याच्या दिवशी राज्यभरातील २३ जिल्ह्यात वसतिगृहांची उद्घाटने करण्याची घोषणा सरकारने केली होती.

Maratha Kranti Morcha
देशातील पेट्रोल, डिझेलच्या भडक्यावर पेट्रोलियममंत्री म्हणाले...

पंजाबराव देशमुख आर्थिक विकास महामंडळाच्या कर्जाची मर्यादा १० लाखावरून १५ लाख करणे, ‘सारथी’ संस्थेच्या सहा उपकेंद्राची स्थापना करून ‘सारथी’च्या कामाची गती वाढवणे या प्रमुख मागण्या सरकारने १५ मार्च पर्यंत पुर्ण करण्याची ग्वाही छत्रपती संभाजीराजे यांना दिली होती. मात्र आज एप्रिल महिना संपत आला तरी त्यावर योग्य कार्यवाही झाली नसल्याने मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आक्रमक होते.

दरम्यान, सुपर न्युमररी च्या बाबतचा प्रस्ताव तयार असून मंत्रीमंडळाच्या समोर मांडण्यात येणार आहे. तर इतर मागण्याबाबतची पुर्तता जवळपास पुर्णत्वास जात असल्याची माहिती सचिव भांगे यांनी दिली. मात्र आंदोलक आक्रमक असल्याने ते ठिय्या उठवण्यास तयार नव्हते. अखेर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार उद्या ( ता.२८) ला मंत्रिमंडळ बैठकीनंतर या आंदोलकांच्या सोबत निर्णायक बैठक घेण्याची हमी मिळाल्यानंतर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन संपवले.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.