Maratha Reservation : मराठा समाजाचा आज पुन्हा एल्गार ; कळंबला छावणीचे स्वरूप

Maratha Reservation : "नो आरक्षण नो वोट" चे बॅनर शहरभर लावण्यात आले आहेत. मूक मोर्चा नंतर "नो वोट नो आरक्षण" ही भूमिका घेतल्याने राज्याचे या मोर्चाकडे लक्ष लागले आहे
maratha reservation
maratha reservationsarkarnama

उस्मानाबाद : मराठा समाजाने आरक्षणासाठी (Maratha Reservation) ५८ महामोर्चा काढूनही आरक्षण मिळाले नाही. पुन्हा एकदा मराठा समाजाने आरक्षणासाठी एल्गार केला आहे. तुळजापूर मधील ठोक मोर्चा नंतर तब्बल तीन वर्षांनंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. (maratha reservation latest news)

आज मराठा आरक्षणसाठी कळंब शहरात राज्यव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चासाठी पोलिसांनी कळंब शहरात तगडा बंदोबस्त लावला आहे.

त्यामुळे मोर्चाच्या आदल्या दिवशीच कळंब शहराला छावणी चे स्वरूप आले आहे. 4 पोलिस आयुक्त, दहा पोलीस निरीक्षक, 32 उप पोलीस निरीक्षक, 555 पोलीस कर्मचारी 555 तसेच रॅपिड ऍक्शन फोर्सच्या दोन तुकड्या बंदोबस्त साठी लावण्यात आल्या आहेत. या मोर्चासाठी राज्यभरातून लाखो मराठा बांधव येणार असल्याचा दावा संयोजक करत आहेत .

maratha reservation
Gram Panchayat Election 2022 : आज 547 ग्रामपंचायतींना गावकारभारी मिळणार

"नो आरक्षण नो वोट" चे बॅनर शहरभर लावण्यात आले आहेत. मूक मोर्चा नंतर "नो वोट नो आरक्षण" ही भूमिका घेतल्याने राज्याचे या मोर्चाकडे लक्ष लागले आहे

मराठा आरक्षण महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर कळंबमध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात असून छावणीचे स्वरूप आले आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी कळंब शहरात सकल मराठा समाजाच्या वतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून या महामोर्चाकरीता राज्यभरातून मराठा बांधव येणार आहेत. येरमाळा रोड, परळी रोड व ढोकी रोड येथे पार्किंगची व्यवस्था केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in