गुणरत्न सदावर्तेंना धक्काबुक्की; मेटेंच्या अत्यंदर्शनासाठी आल्याने कार्यकर्ते आक्रमक

शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे आज सकाळी अपघातात निधन झाले.
Gunaratna Sadavarte, Vinayak Mete
Gunaratna Sadavarte, Vinayak Metesarkarnama

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे आज सकाळी अपघातात निधन झाले. मेटे यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. अनेक राजकीय नेत्यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द करत विनायक मेटे यांच्या निवासस्थानी धाव घेतली. विनायक मेटे यांचे पार्थिव मुंबईतील त्यांच्या घरी अत्यंदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. विनायक मेटे यांच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेण्यासाठी आलेल्या ॲड. गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्याविरोधात मराठा कार्यकर्ते आक्रमक झाले.

Gunaratna Sadavarte, Vinayak Mete
Beed : विनायक मेटेंच्या पार्थिवावर उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार

विनायक मेटे यांच्या पार्थिवाचे अत्यंदर्शन घेण्यासाठी आलेल्या सदावर्ते यांना मराठा कार्यकर्त्यांनी घेरले. सदावर्ते गो बॅक अशा घोषणा देत धक्काबुक्की केली. पोलिसांनी लगेचच हस्तक्षेप करत सदावर्ते यांना तेथून बाहेर काढले. मराठा आरक्षणाबाबत कायम विरोधाची भूमिका सदावर्ते यांनी न्यायालयात घेतल्याने आज कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले.

सदावर्ते यांच्या येण्याने येथील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळली. सदावर्ते यांनी कायम मेटे यांच्या विरोधात भूमिका घेतली. तसेच ते काळे कपडे घालून मुद्दाहून अत्यंदर्शनासाठी आले, असा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केला.

Gunaratna Sadavarte, Vinayak Mete
Accident | विनायक मेटेंच्या घातपाताचा संशय; ड्रायव्हरची होणार चौकशी

तर या प्रसंगानंतर माध्यमांशी बोलताना सदावर्ते म्हणाले, काही तरुणांना हाताशी धरून माझ्यावर हल्ले घडवून आले जात आहेत. अत्यंदर्शनाला जाण्याआधी मी पोलिसांना कळवले होते. राजकारण करण्यासाठी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. चिथावणी देणारे काही राजकीय नेते आहेत, असेही सदावर्ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com