सीएम, डीसीएम यांच्यासाठी भरघोस अधिकारी-कर्मचारी

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये अनेक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होणार आहेत
Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News
Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News Sarkarnama

मुंबई : राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विराजमान झाले. यांच्यासाठी मंत्रालयातील आस्थापनेवर जवळपास दोनशेपेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वर्णी लागणार आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या आस्थापनेवर असलेल्या बहुतांश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सेवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून खंडित होऊन त्यांना त्यांच्या मूळ विभागात रवानगी केली जाते. मात्र, अनेक अधिकाऱ्यांनी अद्यापही आपल्या मूळ विभागात पदभार स्वीकारला नाही. त्याऐवजी सुट्टी टाकून हे अधिकारी आणि कर्मचारी नवीन मंत्री आस्थापनेवर वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील आहेत.

Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News
संवादयात्रा सुरू असतानाच ठाकरेंच्या युवासेनेला आणखी मोठे खिंडार !

नव्याने आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील आस्थापनेवर १४६ अधिकारी व कर्मचाऱ्यांची तर उपमुख्यमंत्र्यांच्या आस्थापनेवर ७२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. यात दोन भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ सनदी अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. मंत्रालयातील विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या आस्थापनेसाठी वर्णी लागणार आहे. त्यातही स्वीय सहायक आणि विशेष कार्य अधिकारीतसेच एक शिपाई आणि वाहन चालक या पदांसाठी शासकीय सेवेत नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करू शकतात.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याबरोबरच प्रत्येक मंत्र्याच्या आस्थापनेवर १५ अधिकारी व कर्मचारी, तर राज्य मंत्र्याच्या आस्थापनेवर १३ अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात शससनाने मान्यता दिली आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आस्थापनेवर सनदी अधिकाऱ्यांपासून यावर सचिव, श सचिव, अवर सचिव, कक्ष अधिकारी, लेख अधिकारी, लिपिक, टंकलेखक आदी श्रेणीतील अधिकारी तास शिपाई, भालदार, चोपदार, वाहन चालक या श्रेणीतील कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. मंत्री आणि राज्यमंत्री यांना एक खासगी सचिव, ३ स्वीय सहायक घेण्याची मुभा असणार आहे.

Eknath Shinde Latest News, Devendra Fadnavis News
अजितदादांच्या फोननंतर मिलिंद नार्वेकर अॅक्शन मोडवर; स्वत: करणार चौकशी

राज्यात सत्रानंतर झाल्यापासून अनेक अधिकारी मंत्री आस्थापनेवर वर्णी लागावी यासाठी कमला लागले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मंत्री आस्थापनेवर असलेले अधिकारी व कर्मचारी महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आपल्या मूळ विभागात रुजू झाले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकार सत्तेबाहेर गेल्याबरोबर यापैकी अनेक अधिकारी आणि कर्मचारी पुन्हा मंत्री आस्थापनेवर येण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in