Sharad Pawar on Love Jihad: राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न पण लव्ह जिहादसारख्या..; शरद पवार स्पष्टचं बोलले

Mumbai News: शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणे, ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama

Sharad Pawar comments on Love jihad: राज्यात आणि देशात अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. पण कारण नसताना लव्ह जिहादसारख्या नाही त्या प्रश्नांना फाजील प्रश्नांना महत्त्व दिलं जातं आहे.समाजा-समाजात तेढ वाढवली जात आहे. या सगळ्या गोष्टींना मीडियानेही फार प्रसिद्धी देऊ नये.” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यातील दंगली, हिंसाचार आणि लव्ह जिहाद सारख्या घटनांवर त्यांनी भाष्य केलं. देशात आणि राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न असताना नाही त्या प्रश्नांना फाजील प्रश्नांना महत्त्व दिलं जातं आहे. केरळमध्ये चर्चेसवर हल्ले झाले. ख्रिश्चन समुदाय हा शांत स्वभावाचा असतो. (Maharashtra Politics) समजा जर एखाद्याची चूक झाली असेल तर चर्चवर हल्ला करण्याचं कारण काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या सर्व हल्ल्यांमागे एक विशिष्ट विचारधाराही दिसून येते. ती विचारधारा देशहिताची नाही. आदिवासी आणि दलित समाजांना जपणं हेही राज्य आणि केंद्र सरकारचं काम आहे, असंही शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar
Sharad Pawar News : कुस्तीपटूंच्या आंदोलनावर शरद पवारांचं मोठे विधान; म्हणाले...

शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणे, ही राज्यकर्त्यांची जबाबदारी आहे. पण राज्यकर्ते आणि त्यांचे सहकारीच जर रस्त्यावर येऊ लागले तर, दोन गटात कटुता निर्माण होत असेल तर समाजासाठी ही काही चांगली गोष्ट नाही, असही पवार म्हणाले. तसेच, पायाभूत सुविधा, पाणी, रस्ते, वीज, आरोग्य शैक्षणिक सुविधा या गोष्टींकडे राज्यकर्त्यांचं लक्ष अधिक असायला हवे, असेही शरद पवार म्हणाले. (Sharad Pawar News)

यावेळी पवार यांना धार्मिक अल्पसंख्यांक यांच्यावरील हल्ले, चर्चवरील हल्ले याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर पवार म्हणाले, 'ओडीशामध्ये आणि काही राज्यामध्ये चर्चवर हल्ले झाले. खिश्चन समाज तसा शांतताप्रिय असतो. कुणाची काही चूक असेल तर पोलीस अॅक्शन घ्यावी. त्यासाठी धार्मिक स्थळांवर कशाला हल्ला करावा? हे जे घडतंय, हे सहजासहजी घडत नाही. हे एकटया दुकट्याचं काम नाही. यामागे काही विचारधारा आहेत. ती विचारधारा समाजाच्या हिताची नाही, असे शरद पवार म्हणाले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com