फराज मलिकांच्या अडचणी वाढणार; ईडी तिसरं समन्स पाठवणार

फराज मलिक (Faraz Malik) याला समन्स बजावण्याची ही दुसरी वेळ आहे पण काल ​​ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले नाहीत.
Nawab Malik News, Faraz Malik news, ED News
Nawab Malik News, Faraz Malik news, ED News sarkarnama

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचा मुलगा फराज मलिक यांना मंगळवारी (१५ मार्च) ईडीने (ED) चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते, मात्र फराज मलिक मंगळवारी हजर झाले नाहीत. फराज मलिक (Faraz Malik) याला समन्स बजावण्याची ही दुसरी वेळ आहे पण काल ​​ते ईडीच्या कार्यालयात हजर झाले नाहीत. (Nawab Malik News)

ईडीच्या अधिकाऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, फराज मलिकला लवकरच तिसरे समन्स पाठवण्यात येणार आहे. कुर्ला परिसरात असलेल्या गोवाला बिल्डिंग कंपाऊंडच्या डील आणि पेमेंटबाबत ईडीला फराजची चौकशी करायची आहे. यापूर्वी ईडीने फराजला समन्स बजावल्यानंतर फराजने आपले वकील पाठवून एक आठवड्याचा वेळ मागितला होता, मात्र ईडीने वेळ देण्यास नकार दिला होता.

Nawab Malik News, Faraz Malik news, ED News
नवाब मलिक यांच्यानंतर त्यांच्या मुलाला ईडीचा दणका

दरम्यान, नवाब मलिक यांच्यावरील कारवाईनंतर त्यांचे पुत्र फराज मलिक (Firaz Malik) यांनाही ईडीने (ED) फराज यांनी चौकशीसाठी समन्स बजावले होते. गेल्या आठवड्यात फराज यांच्या वकिलांनी ईडीकडे संबंधित कागदपत्रे जमा करण्यासाठी आठवड्याचा वेळ मागितला होता. मात्र, ईडीने त्यांची विनंती फेटाळून लावली. त्यामुळे फराज मलिक यांचा पाय आणखी खोलात गेल्याचे बोलले जात आहे.

मंत्री मलिक सध्या ईडी कोठडीत आहेत. आता त्यांचे पुत्र फराज मलिक यांच्या अडचणीही वाढल्या आहेत. ईडीने फराज यांना समन्स बजावून चौकशीसाठी बोलावले होते. ईडीकडून समन्स बजावूनही फराज चौकशीसाठी हजर झाले नाही. त्यांनी वकिलांमार्फत संबंधित कागदपत्रे जमा करण्यासाठी आठवडाभराचा वेळ मागितला होता. तशी विनंती त्यांच्या वकिलांनी केली होती. मात्र, ईडीने ती विनंती फेटाळून लावली.

दरम्यान, ईडीची कारवाई कायदेशीरच असल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयाने मंत्री नवाब मलिक यांची याचिका फेटाळून लावली आहे. ईडीने आपल्याला केलेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करत मलिक यांनी इडीच्या कारवाई विरोधात न्यायालयात दाद मागितली होती. आपल्याला झालेली अटक ही कायद्याला धरुन नसल्याचं मलिक यांनी म्हटलं होतं. मात्र उच्च न्यायालयानं (Mumbai High Court) मलिक यांची याचिका फेटाळून लावली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com