मलिकांचे आरोप म्हणजे; बिरबलाच्या कथेतील न शिजलेली ‘बिर्याणी’

रियाझ भाटीला राष्ट्रवादीने तर पळवले नाही ना !
आमदार अशिष शेलार
आमदार अशिष शेलार सरकारनामा

मुंबई : हायड्रोजन बाँम्ब सोडाच आता नवाब मलिक यांनाच ऑक्सिजनची गरज लागेल. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्याचा नवाब मलिक यांचा प्रयत्न म्हणजे बिरबलाच्या कथेप्रमाणे न शिजलेल्या "बिर्याणी" सारखा प्रकार आहे. नवाब मलिक यांनी मानसिक संतुलन सांभाळावे, अशा शब्दांत भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अशिष शेलार यांनी मंत्री नवाब मलिक यांच्यावर पलटवार केला आहे.

आमदार अशिष शेलार
गणेश गायकवाडला जामीन नाहीच !

शेलार म्हणाले ‘‘ मलिक यांनी जे आरोप केले त्यात काही तथ्य नाही. कितीही खोदकाम केले तरी आरोप करायला सुद्धा तुम्हाला काहीही सापडू शकलेले नाही.मुन्ना यादव, हाजी अराफत शेख, हाजी हैदर आझम हे तिघेही भाजपाचे कार्यकर्ते आहेत. त्यांना विविध पदांवर बसवण्यात आले होते.यापैकी हाजी अराफत शेख, हाजी हैदर आझम त्यांच्यावर एकही गुन्हा नाही. त्यांची पूर्णपणे चौकशी केल्यानंतरच त्यांच्या नेमणुका कायदेशीर झाल्या होत्या.

आमदार अशिष शेलार
शिवसेनेने आमच्या पाठीत खंजीर खुपसला पण…

मुन्ना यादव यांच्यावर राजकीय आंदोलनाचे आरोप आहेत. ते स्वतः विषयी बोलतील खुलासा करतील.गेली दोन वर्ष तर नवाब मलिक यांचे सरकार आहे. विशेषतः नवाब मलिक यांच्या पक्षांच्या नेत्यांकडे गृहमंत्रीपद आहे. आज ते ज्यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्या हाजी हराफत शेख आणि हाजी हैदर आझम यांच्यावर गेल्या दोन वर्षात एक साधा व दखल पात्र गुन्ह्याची नोंद नाही. असले तर आंदोलनाचे गुन्हे असतील, असे शेलार यांनी सांगितले. नवाब मलिक यांनी सांगितलेला मोहम्मद आलम शेख हा हाजी हराफत शेख यांचा भाऊ जेव्हा पकडला गेला तेव्हा काँग्रेसचा सचिव होता आणि सध्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, याची माहिती मलिक यांनी घ्यावी असे शेलाी यांनी सांगितले.

भाटीला राष्ट्रवादीने तर पळवले नाही ना !

रियाझ भाटी गायब असल्याचे सांगितले जात आहे. तो गायब आहे की त्याला पळवले गेले. रियाझ भाटीला पळवून नेण्याचंचे काम तर राष्ट्रवादीने केले नाही ना हा आमचा आरोप आहे. वाझेच्या वसुली गँगमध्ये जी नावे समोर आली. त्यात रियाझ भाटीचेही नाव आले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. रियाझ कोठडीत आला तर सत्यबाहेर येईल. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांना पळवून लावले कींवा सुरक्षित स्थळी ठेवले तर नाही ना अशी शंका येत आहे, असा गंभीर आरोप शेलार यांनी केला.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com