CM Eknath Shinde News Update: पुन्हा एकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या विमानात बिघाड; काय आहे कारण?

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईहून जामनेरला जाण्यासाठी निघाले होते.
CM Eknath Shinde| Devendra Fadanvis
CM Eknath Shinde| Devendra Fadanvis Sarkarnama

Maharashtra Politics: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विमानात पुन्हा बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुंबईहून जामनेरला जाण्यासाठी निघाले होते. विमानाने उड्डाण घेतले. मात्र मार्गात हवामान खराब असल्याने (Air Pressure) विमानाला माघारी यावे लागले.

CM Eknath Shinde| Devendra Fadanvis
Bihar Politics: 'मरण आले तरी चालेल पण, मी भाजपमध्ये..'; नितीश कुमार यांचे मोठं विधान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे बंजारा समाजासाठी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी जात होते. पण अचानक त्यांच्या शासकीय विमानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे त्यांचा जळगाव दौरा रद्द करण्यात आला आहे. दौरा रद्द झाल्यामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्ववारे कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे बोलले जात आहे.

CM Eknath Shinde| Devendra Fadanvis
Sharad Pawar News : पवारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट; राष्ट्रवादी खासदारावरील निलंबन मागे घेण्याची केली विनंती

विमानातील एअर प्रेशरमध्ये तांत्रिक समस्या उद्भवल्याने विमानात हा तांत्रिक बिघाड झाल्याचे बोलले जात आहे. हा तांत्रिक बिघाड लगेच दुरुस्त होणे शक्य नसल्यामुळे दोघांनाही जळगाव दौरा रद्द करावा लागला. अशी माहिती समोर आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com