Sachin Waze Extortion Case : सचिन वाझे केसमध्ये मोठी अपडेट ; ईडीने पूर्वी दिलेली परवानगी नाकारली !

Sachin Waze Mansukh Hiren Case : ईडीने निर्णय का बदलला? कारण काय?
Sachin Waze Extortion Case :
Sachin Waze Extortion Case :Sarkarnama

Mumbai News : मनसुख हिरेन खून प्रकरणात मुख्य आरोपी असलेला वादग्रस्त पोलिस अधिकारी सचिन वाझेने (Sachin Waze) याने आपण माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचे यापूर्वीच न्यायालयाला सांगितले होते. माफिचा साक्षीदार झाल्याने सचिन वाझे नेमके काय गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. ईडीच्या विशेष न्यायालयाने वाझेला माफीचा साक्षीदार होण्यासाठी यापूर्वीच मंजूरी दिली होती. मात्र आता ईडीनकडून ही मंजुरी मागे घेण्यात आली आहे.

Sachin Waze Extortion Case :
सचिन वाझे हा अनिल देशमुखांना फक्त एकदाच भेटला 

महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळात अनिल देशमुख (Anil Deshmukh) हे गृहमंत्री असताना त्यांनी वाझेकडे शंभर कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोप मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांनी केला होता. मात्र त्यांनी या आरोपासोबत पुरावे दिले नव्हते. या प्रकरणी नेमलेल्या चांदीवाल आयोगासमोरही आपल्याकडे याबद्दल माहिती नसल्याचे सांगितले होते.

Sachin Waze Extortion Case :
सचिन वाझे अनिल देशमुखांना म्हणायचा 'नंबर १' तर परमबीर सिंगांना 'राजा'

सीबीआयकडून देशमुखांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या कथित भ्रष्टाचारातच्या प्रकरणात सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार होण्याची पुर्ण तयारी दर्शवली होती. यासाठी वाझेकडून विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. याबाबतीत न्यायालयानेही दखल घेतली होती. वाझेंच्या अर्जावर ईडीने भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश न्यायालयाकडून ईडीला देण्यात आले होते.

Sachin Waze Extortion Case :
सचिन वाझे ठरला माफीचा साक्षीदार : 7 जूनला मोठा गौप्यस्फोट करणार?

याच पार्श्वभूमीवर ईडीकडून वाझेंच्या माफीच्या साक्षीदार होण्याच्या अर्जावर सकारात्मकता दाखवत, वाझेंना माफीचा साक्षीदार होण्याची मान्यता दिली होती. ईडीच्या या अर्जावर होकाराबाबतीत आता न्यायालयाकडून अंतिम मंजुरी येणे बाकी होते. मात्र आता ही दिलेली मंजुरी अचानकपणे मागे घेण्यात आल्याची माहिती मिळते आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com