वाहनचालकांना दणका! आधी पेट्रोल, डिझेल अन् आता 'पीयूसी' महागली

वाहनचालकांना आधी पेट्रोल, डिझेलच्या दरांचे अन् आता पीयूसीचे चटके
वाहनचालकांना दणका! आधी पेट्रोल, डिझेल अन् आता 'पीयूसी' महागली
Vehicles PUC Sarkarnama

मुंबई : ऐन उन्हाळ्यात पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीचा भडका उडाला आहे. या दरवाढीमुळे वाहनचालकांची होरपळ सुरू आहे. इंधन दरवाढीवरून ओरड सुरू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) आता थेट विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या महाराष्ट्रासह इतक राज्यांकडं बोट दाखवलं होतं. यानंतर वाहनचालकांना आता आणखी एक दणका बसला आहे. वाहनाची प्रदूषण नियंत्रण चाचणी (PUC) आता महागली आहे. (Petrol Diesel price hike News)

याबाबतचे परिपत्रक परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी काढले आहे. वाहन प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्रासाठी आता शुल्कात वाढ करण्यात आली आहे. दुचाकीसाठी शुल्कात 30 टक्के तर चारचाकीसाठी 28 टक्के वाढ करण्यात आली आहे. मागील काही महिन्यांपासून पीयूसी केंद्रांकडून या शुल्कात वाढ करण्याची मागणी होत होती. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे, असे परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

Vehicles PUC
बिहारमध्ये 'यादवी'? लालूंच्या कुटुंबातील कलह आणखी वाढला

दुचाकीसाठी आधी पीयूसी चाचणीसाठी 35 रुपये शुल्क होते. ते आता वाढवून 50 रुपये करण्यात आले आहे. चारचाकी वाहनाच्या (पेट्रोल) पीयूसी चाचणीचे शुल्क आता 70 वरुन 100 रुपये करण्यात आले आहे. चारचाकी वाहनाच्या (सीएनजी, एलपीजी आणि पेट्रोल) पीयूसी चाचणीचे शुल्क 90 वरून 125 करण्यात आले आहे. याचवेळी चारचाकी वाहन (डिझेल) पीयूसी चाचणीचे शुल्क 110 वरून 150 करण्यात आले आहे.

Vehicles PUC
आमचे 27 वर्षे प्रेमसंबंध होते पण..; गणेश नाईकांची न्यायालयात कबुली

सुमारे साडेचार महिन्यांनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात 22 मार्चपासून वाढ सुरू झाली होती. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 16 दिवसांत 14 वेळा वाढ करण्यात आली आहे. यामुळे या काळात पेट्रोल, डिझेलचे दर 10 रुपयांनी महागले होते. त्यानंतर 6 एप्रिलनंतर ही दरवाढ थांबली आहे. मागील 21 दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.41 रुपये असून, डिझेलचा दर 96.67 रुपये आहे. मुंबईत पेट्रोलचा दर 120.51 रुपये आणि डिझेलचा दर 104.77 रुपये आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.